जनरल बिपीन रावत हे आता आपल्यामधून निघून गेलेले आहेत. माझ्यासाठी आणि ही देशासाठी मोठी हानी आहे. माझे आणि त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते, असं संभाजी छत्रपती म्हणाले. छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती तीन वर्षा अगोदर व्यापक स्वरुपात दिल्लीत साजरी व्हावी म्हणून मी त्यांना भेटायला गेलो होतो. मी त्यांना सांगितलं की शिवाजी महाराजांचं युद्ध तंत्र पाहिलं तर पाहुणे राष्ट्रपती, लष्कर प्रमुख आणि नौदल प्रमुख असावेत, असं मी त्यांना सांगितलं. त्यांनी त्वरीत येतो म्हणून सांगितलं. मी त्यांना थँक्यू म्हणून निघालो होतो. निघताना ते मला म्हणाले की छत्रपतीजी थोडा वेळ आहे का? सामान्यत: लष्कर प्रमुख दर्जाचे अधिकारी असं म्हणत नाहीत.त्यांनी सांगितल्यावर मी थांबलो असं, संभाजी छत्रपती म्हणाले.