Prime Minister Narendra Modi : ‘सैनिक हो, तुम्हीच माझं कुटुंब’ म्हणंत जवानांसोबत साजरी केली ‘दिवाळी’
आपले जवान सीमेवर डोळ्यात तेल घालून पाहारा देत असतात. त्यामुळे संपूर्ण देश सुखाने झोपू शकतो. आपले जवान म्हणजे आपलं सुरक्षा कवच आहे. जवानांमुळे देशाची सुरक्षा टिकून आहे आणि देशात शांतता आहे- पंतप्रधान नरेंद्र मोदी
PM Modi
Follow us
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही लष्करातील जवानांसोबत दिवाळी साजरी केली.
जम्मू-काश्मीरमधील नौशेरातील जवानांना मिठाई भरवली. तसेच लष्कराच्या जवानांची विचारपूस केली.
सीमेवरील तैनात जवानच माझं कुटुंब आहे. तुमच्यासोबतच मी प्रत्येक दिवाळी साजरी केली आहे, असे मोदी म्हणाले. 2019 मध्येही पंतप्रधान मोदींनी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर (LOC) सैनिकांसोबत दिवाळी साजरी केली होती.
आज संध्याकाळी दिवाळीनिमित्त एक दिवा वीरता, शौर्य, पराक्रम, त्याग आणि तपस्याच्या नावावर लावा. देशातील प्रत्येक नागरिक जवानांना दिवा लावून जवानांना शुभेच्छा देईल. त्यांच्या कर्तृत्वाला सलाम करेल , असे आवाहन मोदींनी देशवासियांना केले.
इथली शांतता बिघडवण्याचे अनेक प्रयत्न झाले, पण प्रत्येक वेळी चोख प्रत्युत्तर दिले गेले. सर्जिकल स्ट्राईकच्या वेळी या ब्रिगेडने बजावलेल्या भूमिकेबद्दल प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटतो असे म्हणत पंतप्रधान मोदींनी जवानांचे कौतुक केले.
नौशेरा सेक्टरमध्ये त्यांनी शहिदांना श्रद्धांजलीही अर्पण केली. नौशेराचे जवान शूर आहेत. जेव्हा जेव्हा शत्रूने आपल्या भूमीवर पाऊल ठेवलं. तेव्हा तेव्हा त्यांना जवानांनी जशास तसं प्रत्युत्तर दिलं
मोदींनी जवानांना दिवाळीच्या शुभेच्छाही दिल्या तसेच नौशेरा येथील वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांचा सत्कार करत, संवाद साधला.
सद्यस्थितीला जम्मू-काश्मीरमधील पूंछमध्ये दहशतवाद्यांविरोधात लष्कराचे ऑपरेशन सुरू असून. गेल्या 23 दिवसांपासून पुंछमध्ये चकमक सुरू आहे . पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर या भागात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.