अभिनेत्री पूजा बत्रा वयाच्या 44 व्या वर्षीही फिटनेस फ्रीक आहे आणि ती इतरांनाही याविषयी जागरूक करते. तिच्या सुंदर व्यक्तिमत्त्वानं ती अनेकांचं लक्ष वेधून घेते. लोकांना तिला फॉलो करायला आवडतं.
ती सोशल मीडियावर फिटनेसशी संबंधित अनेक पोस्टही शेअर करते. लॉकडाउनच्या टप्प्यातही ती असंच करताना दिसली आहे. दररोज ती लोकांसोबत आरोग्याविषयीची रहस्ये शेअर करताना दिसत आहे.
अलीकडे अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे योगाचे महत्त्व सांगितले. अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत ज्यात ती योगा करताना दिसत होती.
यादरम्यान, ती निळ्या रंगाच्या स्पोर्ट्स ब्रा आणि पॅन्टमध्ये दिसली. योगा करत असताना अभिनेत्रीच्या चेहऱ्यावर एक वेगळीच शांतता होती.
तिनं फोटोंसोबत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे- कोणतंही औषध घेण्यापेक्षा योगा करणं चांगलं आहे. योग जर योग्य कौशल्यांनी केला असेल तर अनेक अडचणी दूर करता येतात.