Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुन्हा TRP चा गेम जिंकणार? स्टार प्रवाहच्या मालिकेत प्रेक्षकांची लाडकी जोडी पुन्हा एकत्र

'कोण होतीस तू, काय झालीस तू' ही मालिका येत्या 28 एप्रिलपासून स्टार प्रवाह वाहिनीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेत गिरीजा प्रभू, वैभव मांगले यांच्याही भूमिका आहेत. कावेरी सावंत असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव असून अतिशय हुशार, बिनधास्त आणि स्पष्टवक्ती अशी ही व्यक्तिरेखा आहे.

| Updated on: Apr 02, 2025 | 3:32 PM
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधून घराघरात पोहोचलेला अभिनेता मंदार जाधव नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'कोण होतीस तू, काय झालीस तू' या नव्याकोऱ्या मालिकेत मंदार यश धर्माधिकारी ही व्यक्तिरेखा साकारणार आहे.

1 / 5
'सुख म्हणजे नक्की काय असतं'मधील जयदीप-गौरीच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं. महाराष्ट्राची ही लोकप्रिय जोडी या नव्या मालिकेतून कावेरी आणि यशच्या रुपात पुन्हा एकदा आपली जादू दाखवण्यासाठी सज्ज झाली आहे.

2 / 5
'कोण होतीस तू, काय झालीस तू' मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना मंदार म्हणाला, "स्टार प्रवाहसोबत काम करणं नेहमीच आनंददायी अनुभव असतो. श्री गुरुदेव दत्त, सुख म्हणजे नक्की काय असतं नंतर आता कोण होतीस तू, काय झालीस तू ही तिसरी मालिका स्टार प्रवाहसोबत करतोय."

3 / 5
"आधीच्या दोन्ही भूमिकांपेक्षा वेगळी अशी ही व्यक्तिरेखा आहे. या मालिकेत मी यश धर्माधिकारी हे पात्र साकारतोय. दिसायला अतिशय देखणा, आपल्या लूक्सबद्लल सदैव जागृक असलेल्या यशला फॅशनची उत्तम जाण आहे. अनेक मुली यशच्या प्रेमात आहेत मात्र यशने आईला वचन दिलं आहे की तिच्या आवडीच्या मुलीशीच लग्न करेन," असं तो पुढे म्हणाला.

4 / 5
"त्याचं त्याच्या कुटुंबावर आणि खासकरून त्याच्या आईवर प्रचंड प्रेम आहे. आई जे सांगेल त्यावर डोळे झाकून विश्वास ठेवतो. हे पात्र साकारताना खूप गोष्टी नव्याने शिकायला मिळत आहेत. मला खात्री आहे जे प्रेम प्रेक्षकांनी जयदीप या पात्राला दिलं तेच प्रेम यश या पात्रावर देखील करतील," असा विश्वास त्याने व्यक्त केला.

5 / 5
Follow us
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट
हातात हात ओठांवर हसू... ठाकरे गटाकडून राज-उद्धव यांचा 'तो' फोटो ट्वीट.
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा
मला नाही वाटत..., राज-उद्धव एकत्र येण्यावरून सामंतांचा ठाकरेंवर निशाणा.
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत
'तो करंटेपणा आमच्याकडून नाही',राज यांच्या भूमिकेचं राऊतांकडून स्वागत.
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्
....म्हणून माझं सरकार पाडलं, उद्धव ठाकरेंनी सारंकाही सांगितलं अन्.
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका
तो जय महाराष्ट्र बोलना होगा, सुपारी घेणारं सरकार म्हणत ठाकरेंची टीका.
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'
उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंना एकच अट; म्हणाले, 'मी सुद्धा तयार, पण...'.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या.
युती, शिवसेनेच्या फुटीवर राज ठाकरे म्हणाले, मी आयत्या पिठावर रेघोट्या..
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती
मुंबईकरांनो... 'ते' 18 दिवस चिंतेचे... हवामान खात्याकडून मोठी माहिती.
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?
लाडकी बहीण फक्त मतांसाठीच? महायुतीच्या बड्या मंत्र्याला म्हणायचंय काय?.
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्...
संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी? FB प्रोफाईलचा फोटो बदलला अन्....