अमेरिकन पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने पुन्हा एकदा अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत असलेल्या संबंधावर भाष्य केले आहे.
पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने म्हटंल आहे की, माझ्या आयुष्यातील ते 90 सेकंद सर्वात वाईट होते जे मी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत घालवले होते.
अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांच्या अफेअरची चर्चा गेल्या अनेक वर्षांपासून केली जाते.
स्टॉर्मी डॅनियल्सने सांगितले की, 2006 साली घडलेल्या त्या संपूर्ण घटनेच्या 'मी फक्त माझा तिरस्कार करते'.
डोनाल्ड ट्रम्प नेहमीच पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्ससोबत कोणतेच नाते नसल्याचे सांगतात मात्र, या दोघांच्या रिलेशनची चर्चा सर्वत्र होती.
पोर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सने असाही आरोप केला आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी तिला शांत राहण्यासाठी मोठी रक्कमही दिली होती.