‘गुरूभेटीचं महत्त्व त्यांना जास्त कळेल जे..’; प्राजक्ता माळीसोबत कुटुंबीयांनीही घेतली श्री श्री रविशंकर यांची भेट
अभिनेत्री प्राजक्ता माळीसह तिच्या कुटुंबीयांनी बेंगळुरू इथल्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फाऊंडेशनच्या आश्रमात अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर यांची भेट घेऊन त्यांचा आशीर्वाद घेतला. या भेटीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत प्राजक्ताने आनंद व्यक्त केला आहे.
![अध्यात्मिक गुरू श्री श्री रवीशंकर आणि त्यांच्या 'आर्ट ऑफ लिव्हिंग' या संस्थेला अभिनेत्री प्राजक्ता माळी खूप मानत असल्याचं तिच्या सोशल मीडियावर पोस्टवरून लक्षात येत. प्राजक्ताने अनेकदा बेंगळुरूमधल्या त्यांच्या आश्रमालाही भेट दिली.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-7.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 7
![नुकतंच प्राजक्ताने 'आर्ट ऑफ लिव्हिंग' फाउंडेशनच्या बेंगळुरूमधल्या आश्रमात गुरू श्री श्री रवीशंकर यांच्यासमोर लावणी नृत्य सादर केलं होतं. त्यानंतर आता तिने काही फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामध्ये प्राजक्तासोबतच तिचे कुटुंबीयसुद्धा गुरूंचा आशीर्वाद घेताना दिसत आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-6.jpg)
2 / 7
!['नृत्य सादरीकरण वगैरे आहेच; पण खरं म्हणजे मी जाते गुरूंना भेटण्याकरीता, आशीर्वाद घेण्याकरीता आणि यावेळी माझ्याबरोबर घरातल्यांनाही गुरूदर्शन मिळालं, याचा मला अत्यानंद झालाय,' अशा शब्दांत तिने भावना व्यक्त केल्या आहेत.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-1.jpg)
3 / 7
![याविषयी तिने पुढे लिहिलं, 'विशेषतः 1- याज्ञसेनी (भाची). हा तिचा महाराष्ट्राबाहेरचा पहिला प्रवास होता. तो ही आश्रमाचा. त्यात गुरूदेव दर्शन, त्यांना स्वतःचं नाव सांगत वगैरे वगैरे. 2- तनया.. वाढदिवसाच्या आदल्या दिवशी आशीर्वाद घेता आलं. आई, नेहा, दिव्यालाही पहिल्या खेपेत दर्शन मिळालं.'](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-2.jpg)
4 / 7
!['बाकी मी तर आश्रमात येत जात राहीनच. कारण हे माझं जणू घरच आहे. गुरूभेटीचं महत्व त्यांना जास्त कळेल, जे सुदर्शन क्रिया शिकलेत. अॅडव्हान्स कोर्सनंतर आणखी जास्त कळेल. चार ते पाच अॅडव्हान्सनंतर अधोरेखित होत राहील,' असंही तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-5.jpg)
5 / 7
![काही दिवसांपूर्वीच प्राजक्ताने पद्म पुरस्कार विजेत्या कलाकारांच्या मांदियाळीत; भरतनाट्यम्, कथक, कुचिपुडी, कथकली, हिंदुस्तानी- कर्नाटक संगीताच्या थोडक्यात शास्त्रीय- उपशास्त्रीय नृत्य संगीताच्या मेळाव्यात लावणी सादर केली होती.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-4.jpg)
6 / 7
![शूटिंगच्या व्यग्र वेळापत्रकातून वेळ काढून प्राजक्ता आवर्जून बेंगळुरूतील या आश्रमाला भेट देताना दिसते. याठिकाणी तिने बऱ्याचदा सुदर्शन क्रिया आणि अॅडव्हान्स कोर्स केला आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/01/Prajakta-Mali-in-Bengaluru-ashram-3.jpg)
7 / 7
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा... स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T140538.174.jpg?w=670&ar=16:9)
स्मिता पाटील यांच्या मुलाच दुसर लग्न, राज बब्बरना नाही बोलावलं, सावत्र भाऊ म्हणाला, माझ्या कुत्र्याच्या सुद्धा...
![शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feature-2025-02-15T122051.671.jpg?w=670&ar=16:9)
शाहरुख-सलमानच्या तोडीचा आजचा स्टार अभिनेता, त्याच्या वडिलांनी सेटवर झाडू सुद्धा मारलेली
![मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/makarand-feature-1.jpg?w=670&ar=16:9)
मकरंद अनाजपुरेंच्या पत्नीही आहेत अभिनेत्री, 'या' सिनेमात केलंय काम
![Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली? Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/feautre.jpg?w=670&ar=16:9)
Chhaava : 'छावा' चित्रपटातील रोलसाठी विकी कौशल, रश्मिका मंधानाने किती कोटी फी आकारली?
![कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/rinku-rajguru-1.jpg?w=670&ar=16:9)
कृष्णराज महाडिक यांच्यासोबतच्या फोटोनंतर रिंकूने चाहत्यांना दिल्या व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा