
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वकांक्षी ‘सेंट्रल व्हिस्टा प्रोजेक्ट’ झालेल्या नव्या संसद भवनाचं उद्घाटन २८ मे रोजी होत आहे. 10 डिसेंबर 2020 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या भवनाचे भूमिपूजन केले होते. नव्या संसद भवनाच्या बांधकामाला जवळपास 862 कोटी रुपये खर्च आला आहे.

नवीन संसद भवनाचे बांधकाम टाटा प्रोजेक्टने केले आहे. पण या इमारतीचे डिझाईन आर्किटेक्ट बिमल पटेल यांनी केले आहे. बिमल पटेल हे गुजरातमधील अहमदाबादचे आहेत. याआधीही त्यांनी अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली आहे.

बिमल पटेल यांनी अहमदाबादच्या सेंट झेवियर्स हायस्कूलमधून शिक्षण घेतले आहे. सेंटर फॉर एन्व्हायर्नमेंट प्लॅनिंग अँड टेक्नॉलॉजीच्या स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधून त्यांनी आर्किटेक्चरचा अभ्यास केला.

1984 मध्ये CEPT मधून आर्किटेक्चरमध्ये पहिली व्यावसायिक पदवी मिळवल्यानंतर पटेल बर्कले येथे गेले. तिथे त्यांनी कॉलेज ऑफ एन्व्हायर्नमेंटल डिझाइनमध्ये शिक्षण घेतले. 1995 मध्ये त्यांनी पीएचडी पदवी मिळवली.

पटेल यांनी संसद भवन आणि सेंट्रल विस्टा, वाराणसीतील विश्वनाथ धाम, काशी विश्वनाथ मंदिर, हैदराबाद येथील आगा खान अकादमी, साबरमती रिवरफ्रंट डेवलपमेंट प्रोजेक्ट, आयआयएम अहमदाबादचा प्रोजेक्टसह अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली आहे.