
तारक मेहता का उल्टा चश्मा ही मालिका गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. तारक मेहता का उल्टा चश्मा मालिकेच्या निर्मात्यांवर मिसेस सोढी अर्थात जेनिफर मिस्त्री हिने गंभीर आरोप केले.

जेनिफर मिस्त्री हिच्यानंतर शोमध्ये रिढा रिपोर्टरची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्रिया आहूजा हिने देखील काही मोठे खुलासे हे केले आहेत. आता या दोघींबद्दलचे मोठे अपडेट पुढे येत आहे.

नुकताच प्रिया आहूजा हिने काही फोटो आणि व्हिडीओ हे शेअर केले आहेत. विशेष म्हणजे यामध्ये प्रिया आहूजा आणि जेनिफर मिस्त्री यासोबतच दिसत आहेत.

इतकेच नाही तर जेनिफर मिस्त्री आणि प्रिया आहूजा या लावणी करताना दिसत आहेत. यामुळे आता अनेक चर्चांना उधाण झाल्याचे दिसत आहे. चाहते पोस्टवर मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत.

या दोघी तारक मेहता सोडल्यानंतरही एकसोबत काम करताना दिसत आहेत. यामुळे आता या नेमक्या कोणत्या शोमध्ये एकसोबत काम करत आहेत, याबद्दल चाहत्यांमध्ये उत्सुकता दिसत आहे.