निक जोनाससोबत ‘या’ 166 कोटींच्या बंगल्यात राहायला जाणार प्रियांका चोप्रा

‘पेज सिक्स’च्या रिपोर्ट्सनुसार, मालमत्तेच्या दुरुस्तीचा खर्च हा 1.5 दशलक्ष डॉलर्सपासून 2.5 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच जवळपास 13 ते 20 कोटी रुपयांपर्यंत आला होता. लॉस एंजिलिसमधील या घराच्या दुरुस्तीचं काम पूर्ण होईपर्यंत प्रियांका-निक मुलीसह दुसरीकडे राहत होते.

| Updated on: Apr 21, 2024 | 5:46 PM
अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि तिचा पती निक जोनास हे लवकरच त्यांच्या लॉस एंजिलिसमधल्या नूतनीकरण केलेल्या घरात राहायला जाणार आहेत. त्यांच्या या भव्यदिव्य घराची किंमत तब्बल 20 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच 166 कोटी रुपयांहून अधिक आहे.

1 / 5
2018 मध्ये लग्न केल्यानंतर प्रियांका निकसोबत लॉस एंजिलिसमध्ये स्थायिक झाली. 'द हॉलिवूड हिल्स मॅन्शन'मध्ये हे दोघं त्यांची मुलगी मालती मेरीसोबत राहतात. या घराचं बांधकाम पुन्हा नव्याने करण्यात आलं असून त्याचे काही फोटो समोर आले आहेत.

2 / 5
प्रियांका-निकचं हे घर राहण्यालायक राहिलेलं नव्हतं, म्हणून ते काही महिन्यांपूर्वी दुसरीकडे राहायला गेले होते. घरात ठिकठिकाणी पाण्याची गळती होत असल्याने बुरशीचा प्रादुर्भाव झाला होता. इतकंच नव्हे तर त्यांनी घराच्या विक्रेत्याविरोधात कायदेशीर तक्रारसुद्धा केली होती.

3 / 5
लॉस एंजिलिसमध्ये प्रियांका आणि निकचं अत्यंत आलिशान घर आहे. सात बेडरुम्स, नऊ बाथरुम्स, तापमान नियंत्रित ठेवणारं वाइन सेलर, शेफचं किचन, होम थिएटर, बोलिंग ॲली, स्पा आणि स्टीम शॉवर, जिम आणि बिलियर्ड्स रुम.. अशा सर्व सुविधा या आलिशान घरात आहेत.

4 / 5
2019 मध्ये प्रियांका-निकने हे घर तब्बल 20 दशलक्ष डॉलर्सना विकत घेतलं होतं. प्रियांका-निकने मे 2023 मध्ये या घराच्या विक्रेत्याविरोधात खटला दाखल केला होता. कारण घर खरेदी केल्यापासूनच स्विमिंग पूल आणि स्पा भागात विविध समस्या निर्माण होऊ लागल्या होत्या, असा आरोप त्यांनी केला आहे.

5 / 5
Follow us
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.