पुण्यातील पहिल्या भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम कुठपर्यंत आले, पाहा फोटोंमधून

| Updated on: May 31, 2023 | 2:52 PM

Pune Metro : पुणे मेट्रोचे कामे वेगाने सुरु आहे. पुणे मेट्रोच्या शिवाजीनगर भूमिगत स्थानकाचे काम आता जवळपास पूर्ण होत आले आहे. हे भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.

1 / 8
पुण्यातील पाहिले वाहिले भूमिगत मेट्रो स्थानकाचे काम आता जवळपास संपले आहे. शिवाजी नगर मेट्रो स्टेशन हे काही दिवसातच प्रवाशांना खुलं होणार आहे. शिवाजी नगर भागात असणार हे मेट्रो स्टेशनला एक वेगळेपणा असणार आहे. कारण या मेट्रो स्टेशनची वास्तू इतिहासाची साक्ष देणार आहे.

2 / 8
पुण्याला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. याच इतिहासाची ओळख व्हावी, यासाठी पुण्यातील मेट्रो स्थानकावर शिवकालीन इतिहास साकारला गेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाची आणि पुण्याच्या इतिहासाची साक्ष हे स्थानक देणार आहे.

3 / 8
या स्थानकाची वास्तू ही तत्कालीन वाड्यांसारखी बांधली गेली असून तसेच स्थानक परिसरात पुरातन नदीचे घाट, मेघडंबरी आणि दीपमाळ देखील बांधली गेली आहे. पूनववडी ते पुणे अशी शहराची ऐतिहासिक साक्ष देणार पुण्यातलं हे शिवाजीनगर मेट्रो स्टेशन असणार आहे.

4 / 8
शिवाजीनगर भूमिगत मेट्रो स्थानकाची खोली जमिनीच्या 108 फूट खाली (33.1 मीटर) एवढी आहे. यामुळे शिवाजीनगर भूमिगत स्थानक देशातील सर्वाधिक खोल स्थानक ठरले आहे.

5 / 8
मेट्रोच्या भूमिगत स्थानकाचे छत 95फूट उंच आहे. या ठिकाणी थेट सूर्यप्रकाश किंवा नैसर्गिक प्रकाश पडेल, अशी रचना करण्यात आली आहे. या प्रकारचे वैशिष्ट्य असलेले हे एकमेव स्थानक आहे.

6 / 8
मेट्रो स्थानकाचा एकूण परिसर 11 एकरमध्ये पसरलेला आहे. स्थानकामध्ये येण्या-जाण्यासाठी एकूण सात दरवाजे असतील. पार्किंगची सुविधाही यामध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.

7 / 8
मेट्रो प्रकल्पाच्या पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट या १७ किलोमीटर आणि वनाज ते रामवाडी या १६ किलोमीटर अंतराच्या दोन मार्गिकांची कामे सुरू आहेत. या दोन्ही मार्गिका शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय स्थानकात एकमेकांना एकत्र येणार आहेत.

8 / 8
स्वारगेट ते बुधवार पेठ अंडरग्राऊड मेट्रो मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. निगडी ते सिव्हिल कोर्ट आणि कोथरूड कोथरूड ते सिव्हिल कोर्ट मार्ग पूर्णत्वाच्या मार्गावर आहे. एकूण 12 किमीचा हा मार्ग असून आता याचे काम पूर्ण झाले आहे.