Photo : कास पठारच्या धर्तीवर पुणे-मुंबई एक्सप्रेस मार्ग बहरला
Mumbai Pune Expressway : पुणे-मुंबई एक्सप्रेस महामार्ग वाहतूक कोंडी आणि अपघातामुळे चर्चेत असतो. परंतु आता हा महामार्ग कास पठाराच्या धर्तीवर विविध रंगानी फुलांनी बहरला आहे. मावळात विविध रंगाच्या फुलांची उधळण होतेय.
1 / 5
सातारा जिल्ह्यातील कासचे पठार सर्वत्र प्रसिद्ध आहे. कास पठारावर पावसाळा सुरू झाल्यावर असंख्य प्रकारची रानफुले फुलतात. ते पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर येतात. या ठिकाणी अनेक दुर्मीळ प्रजातींची फुले आहेत.
2 / 5
युनेस्को २०१२ साली जागतिक वारसा स्थळांच्या कास पठारचा यादीत समावेश केला गेला आहे. आता कास पठारसारखा अनुभव मावळमध्ये येत आहे. कास पठारच्या धर्तीवर सोनकी आणि तेरडा या रानटी फुलांनी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे बहरला आहे.
3 / 5
पावसाळ्यात मावळातील निसर्ग सौंदर्य बहरू लागते. निसर्ग भरभरुन दान या भूमीला देते. हिरवेगार नटलेल्या या भूमीवर सोनकी आणि तेरडा ही फुले अधिक सुंदर दिसतात. महामार्गावर हवे संगे डुलणारी फुले पाहुन जाणाऱ्या-येणाऱ्या लोकांना आनंद होतो.
4 / 5
पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर दुतर्फा पिवळी सोनकीची फुले, लाल आणि गुलाबी तेरडा बहरु लागला आहे. त्यामुळे एक्सप्रेस हायवेच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. अनेक वाहनधारक या ठिकाणी उतरुन फोटो काढण्याची हौस पूर्ण करतात.
5 / 5
कास पठार ज्याप्रमाणे विविध जातींच्या फुलांनी बहरतो. त्याचप्रमाणे पुणे-मुंबई महामार्गवर काही जातींची फुले मावळ तालुक्यात देखील बहरतात. त्यामुळे सप्टेंबरमध्ये ते डिसेंबरपर्यंत मावळ तालुक्याच्या सौंदर्यात आणखीनच भर पडते.