पुणे जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो मार्गावर चार स्थानके आहेत. जिल्हा न्यायालय, कसबा पेठ, मंडई अन् स्वारगेट ही स्थानके आहेत.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या अंडग्राऊंड मेट्रोचे तिकीट दरही जाहीर झाले आहेत. जिल्हा न्यायालय ते कसबा पेठ स्थानकाला नागरिकांना १० रुपये मोजावे लागणार आहेत. तर जिल्हा न्यायालय ते मंडई आणि स्वारगेट या दोन्ही ठिकणी जाण्यासाठी १५ रुपये लागणार आहेत.
स्वारगेट ते मंडईपर्यंत जाण्यासाठी १० रुपये तिकीट लागणार आहेत. तर स्वारगेटपासून कसबा पेठ आणि जिल्हा न्यायालय या स्थानकांसाठी १५ रुपये आकारण्यात आले आहेत.
पुणे मेट्रोच्या ३३ किमीच्या टप्पा एकचे काम पूर्ण झाले आहे. पीसीएमसी ते स्वारगेट या प्रवासासाठी ३४ मिनिटे वेळ जाणार असून त्यासाठी ३५ रुपये भाडे असणार आहे.
वनाझ ते रामवाडी या मार्गावरील प्रवासी जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे इंटरचेंज करून स्वारगेट किंवा पीसीएमसी या दिशेने प्रवास करू शकतात.
जिल्हा न्यायालय ते स्वारगेट मार्गावर बाजारपेठ आहे. शनिवार वाडा, कसबा गणपती आहे. यामुळे या ठिकाणी येणाऱ्या लोकांना मोठ्याप्रमाणावर या मेट्रो मार्गाचा फायदा होणार आहे. तसेच दगडूशेठ गणपती मंदिरात जाणेही सोपे होणार आहे.