Photo: रब्बी पिकांनी शिवार बहरला, पोषक वातावरणामुळे उत्पादन वाढीची अपेक्षा
नांदेड : यंदा प्रथमच रब्बी हंगामात शेतकऱ्यांनी पीक पध्दतीमध्ये बदल केला होता. मराठवाड्यात रब्बी हंगामात ज्वारी हे मुख्य पीक असताना यंदा हरभाऱ्याचा पेरा वाढला आहे. बदलती परस्थिती आणि पावसामुळे लांबलेल्या पेरण्या यामुळे शेतकऱ्यांनी हा बदल केला मात्र, पेरणीनंतर पीक उगवण होण्यापूर्वीच अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण यामुळे रब्बी हंगामाबाबतच प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. शिवाय मध्यंतरी वाढलेला गारठा यामुळे देखील पिकांवर किडीचा प्रादुर्भाव झाला होता. पण आता वातावरण निवळले असून शेतकऱ्यांकडे मूबलक प्रमाणात पाणीसाठा असल्याने नांदेड जिल्हा शिवारात गहू, हरभरा, ज्वारी ही सगळीच पीके बहरू लागली आहे.
Most Read Stories