रजनीकांत ते मणी रत्नम.. ऐश्वर्याच्या दुसऱ्या लग्नाला साऊथ सुपरस्टार्सची मांदियाळी

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध दिग्दर्शक शंकर यांची मुलगी ऐश्वर्याचा शाही विवाहसोहळा चेन्नईमध्ये पार पडला. या लग्नाला अनेक साऊथ सुपरस्टार्सनी हजेरी लावली होती. रजनीकांत, कमल हासन, मणिरत्नम, विक्रम, नयनतारा यांसह इतरही कलाकार लग्नाला उपस्थित होते.

| Updated on: Apr 16, 2024 | 1:55 PM
चित्रपटांमधील भव्यदिव्य सेट्स आणि लार्जर दॅन लाइफ सीन्ससाठी दाक्षिणात्य दिग्दर्शक शंकर ओळखले जातात. आता त्यांनी त्यांच्या मुलीच्या लग्नासाठीही अशीच भव्यदिव्य तयारी केली आहे. चेन्नईमध्ये 15 एप्रिल रोजी ऐश्वर्या शंकरचा लग्नसोहळा धूमधडाक्यात पार पडला.

1 / 6
या ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लग्नसोहळ्याची भव्यदिव्यता सहज पहायला मिळतेय. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याच्या लग्नाला साऊथ सुपरस्टार्सची खास मांदियाळी होती.

या ग्रँड लग्नसोहळ्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये लग्नसोहळ्याची भव्यदिव्यता सहज पहायला मिळतेय. इतकंच नव्हे तर ऐश्वर्याच्या लग्नाला साऊथ सुपरस्टार्सची खास मांदियाळी होती.

2 / 6
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्यासोबत रजनिकांतसुद्धा या लग्नाला उपस्थित होते. रजनीकांत यांनी शंकर यांच्यासोबत तीन चित्रपटांमध्ये काम केलं. शिवाजी, एथीरान आणि 2.0 या चित्रपटांसाठी दोघांनी एकत्र काम केलं होतं.

3 / 6
अभिनेते कमल हासनसुद्धा ऐश्वर्याच्या लग्नाला उपस्थित होते. ते दिग्दर्शक शंकर यांच्यासोबत 'इंडियन 2' या चित्रपटामध्ये काम करत आहेत. याशिवाय दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही काही नामवंत कलाकार या शाही लग्नसोहळ्याला हजर होते.

4 / 6
दिग्दर्शक मणिरत्नम, अभिनेत्री सुहासिनी, विक्रम, सूर्या, कार्ती आणि अर्जुन यांचीही उपस्थिती पहायला मिळाली. अभिनेत्री नयनतारासुद्धा पती विग्नेश शिवनसोबत या लग्नात हजर होती. त्यांनी सोशल मीडियावरही लग्नसोहळ्याचे फोटो शेअर केले आहेत.

5 / 6
दिग्दर्शक शंकर सध्या दोन मोठ्या दाक्षिणात्य चित्रपटासाठी काम करत आहेत. रामचरणच्या 'गेम चेंजर' या तेलुगू चित्रपटाचं दिग्दर्शन ते करत आहेत. तर कमल हासन यांच्या 'इंडियन 2' या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची जबाबदारीसुद्धा त्यांच्यावरच आहे.

6 / 6
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.