Ayodhya Ram Mandir PHOTO | अयोध्या नगरीतील प्रस्तावित राम मंदिराचे काही फोटो
अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन (ayodhya ram mandir photo) होणार आहे.

- अयोध्या नगरीतील राम मंदिर भूमिपूजन सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला आहे.
- देशाच्या कानाकोपऱ्यातून संत, महंत, भक्तगण अयोध्येत पोहोचले आहेत.
- अयोध्येला दिवाळीचे स्वरुप आले असून (बुधवार 5 ऑगस्ट) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दुपारी 12.30 वाजता भूमिपूजन होणार आहे.
- अयोध्येतील भव्य राम मंदिराच्या प्रस्तावित मॉडेलचे फोटो तीर्थक्षेत्राने ट्विटरवर जाहीर केले आहेत
- श्री रामजन्मभूमी मंदिर हे भारतीय वास्तुशिल्प, आधुनिकता आणि भव्यतेचा मिलाफ असेल.
- नवीन डिझाईनमध्ये तीन घुमट जोडले गेले आहेत.
- या स्तंभांची संख्या 160 वरुन 366 पर्यंत वाढवण्यात आली आहे.
- या मंदिराच्या जिन्याची रुंदी 6 फुटांवरुन 16 फूट करण्यात आली आहे.
- तसेच मंदिराची उंची 141 फुटांवरुन 161 फुटांपर्यंत वाढवण्यात आली आहे.
- राम मंदिराच्या भूमिपूजनाला देशातील 36 परंपरांचे 135 संत उपस्थिती लावणार आहेत.
- जवळपास 1500 ठिकाणांहून माती आणि 2000 ठिकाणांहून पवित्र जल अयोध्येत नेण्यात आले आहे.