रामनवमीच्या पूर्वसंध्येला ( बुधवारी) , शिवसेना लोकसभा गटनेते खासदार राहुल शेवाळे यांच्या वतीने प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या ' गीतरामायण ' या कार्यक्रमाला रसिक श्रोत्यांनी हजेरी लावली.
या कार्यक्रमादरम्यान 1992 साली अयोध्येला गेलेल्या कारसेवकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी खासदार राहुल शेवाळे, सौ. कामिनी राहुल शेवाळे श्री रणजित सावरकर, यांच्यासह शिवसेना उपनेत्या सौ. शीतल म्हात्रे, शिल्पा देशमुख, सचिव श्री संजय म्हशीलकर, भाजपा जिल्हाध्यक्ष श्री राजेश शिरवाडकर, मनसेचे नेते संदीप देशपांडे, संदीप धुरी यांसह महायुतीचे अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते.
रामनवमीच्या निमित्ताने, रामनवमीच्या पूर्वसंध्येला आयोजित केलेल्या गीतरामायण कार्यक्रमाचे सादरीकरण श्री श्रीधर फडके यांनी केले.
गीतरामायण या अजरामर कलाकृतीतील सुरेल गाणी सादर करताना याविषयीचे अनेक किस्सेही फडके यांनी सांगितले.
यावेळी नितीन म्हात्रे, अतुल घरत, समीर कोपिकर, चंद्रकांत ठाकूर, उमेश ठाकूर, रवींद्र खेडेकर, सुरेश भोईर, मंगेश पवार, मंगेश मुंडे, संजू परब या कारसेवकांना रामायणाची प्रत देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. या संपूर्ण कार्यक्रमाला मुंबईतील रसिकांनी उदंड प्रतिसाद दिला.