TV च्या राम-सीतेनं कुटुंबीयांच्या नकळत गुपचूप उरकलं होतं लग्न; त्यावेळी गुरमीतचं वय फक्त..

रामायण या मालिकेतून लोकप्रिय झालेले कलाकार गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांनी कमी वयातच गुपचूप लग्न उरकलं होतं. याविषयी गुरमीतने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुलासा केला.

| Updated on: Nov 30, 2024 | 12:28 PM
'रामायण' या मालिकेत राम-सीतेची भूमिका साकारलेले गुरमीत चौधरी आणि डेबिना बॅनर्जी यांनी 2011 मध्ये लग्न केलं होतं. मात्र सर्वांसमोर झालेल्या या लग्नाआधीच गुरमीत आणि डेबिनाने गुपचूप त्यांचं लग्न उरकलं होतं.

1 / 7
2003 मध्ये जेव्हा गुरमीत 19 वर्षांचा होता, तेव्हाच त्याने डेबिनाशी लग्न केलं होतं. या लग्नाबद्दल दोघांच्या कुटुंबीयांनाही माहित नव्हतं. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत गुरमीतने या लग्नाचा खुलासा केला.

2 / 7
"मी 19 वर्षांचा होतो, तेव्हाच डेबिनाशी लग्न केलं होतं. त्यावेळी ती एका साऊथ सुपरस्टारसोबत काम करत होती आणि मी इंडस्ट्रीत स्ट्रगल करत होतो. माझ्याकडे बाइकमध्ये पेट्रोल टाकण्यासाठीही पैसे नसायचे", असं गुरमीत म्हणाला.

3 / 7
"डेबिना त्यावेळी मोठमोठ्या स्टार्ससोबत शूटिंग करत होती. त्यावेळी माझ्या मनात विचार आला की ती शूटिंग करत राहील आणि मी इथे बाइकवरच फिरत बसेन. याविषयी एकेदिवशी मी तिच्याशी बोलत होतो, तेव्हा तिने लगेच लग्नाबद्दल विचारलं", असं त्याने पुढे सांगितलं.

4 / 7
डेबिनाने लग्नाबद्दल विचारताच गुरमीतनेही तडकाफडकी होकार दिला. "मी तिला म्हटलं की लग्नाची सर्व तयारी मी करतो. तू फक्त तिथे ये. मी सर्व तयारी केली होती. तिला वाटलं की लग्नाबद्दल आम्ही फक्त मस्करीत बोलत होतो. पण मी गंभीर होतो", असं गुरमीतने सांगितलं.

5 / 7
अखेर गोरेगावमधल्या एका मंदिरात दोघांनी लग्न केलं आणि त्यावेळी दोघांचे तीन-चार मित्रमैत्रिणीसुद्धा उपस्थित होते. या लग्नाबद्दल गुरमीत आणि डेबिनाच्या कुटुंबीयांना काहीच माहित नव्हतं.

6 / 7
लग्नानंतर गुरमीत आणि डेबिना 'रामायण' या मालिकेत राम आणि सीतेची भूमिका साकारू लागले. त्यादरम्यान त्यांनी घरी पालकांना गुपचूप उरकलेल्या लग्नाबद्दल सांगितलं. तोपर्यंत दोघांनी बऱ्यापैकी पैसे कमावले होते.

7 / 7
Follow us
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.