Zodiac Signs | ‘या’ 4 राशींसाठी मार्च महिना ठरणार अत्यंत लकी, नशीब उजळवण्याची हीच सुवर्णसंधी….
मार्च महिन्यात सूर्य, मंगळ आणि शुक्र हे तीन प्रमुख ग्रह राशी बदलणार आहेत. रविवार, 6 मार्च रोजी ग्रहांचा राजकुमार बुध मकर राशी सोडून कुंभ राशीत प्रवेश करेल. मंगळवार, 15 मार्च रोजी सूर्य मीन राशीत प्रवेश करेल. यासह मीन संक्रांतीची सुरुवात होईल. मीन संक्रांतीच्या काळात नामस्मरण, विद्या, कान टोचणे, भोजन प्राशन, उपनयन विधी, विवाह सोहळा, गृहप्रवेश आणि वास्तूपूजा यांसारख्या विधींना मनाई आहे.