
अभिनेत्री रवीना टंडन (Raveena Tandon) हिच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. एक काळ असा होता, जेव्हा सर्वत्र फक्त आणि फक्त अभिनेत्रीच्या सौंदर्याची जादू रंगली होती.

अभिनेत्री रवीना टंडन हिच्या सौंदर्यांच्या आणि अभिनयाच्या चर्चा कायम चाहत्यांमध्ये रंगलेल्या असतात. वयाच्या ४८ व्या वर्षी देखील अभिनेत्री ग्लॅमरस दिसते.

रवीना टंडन (Raveena Tandon) हिने स्वतःची मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर बॉलिवूडमध्ये भक्कम स्थान निर्माण केलं आहे.

आज रवीना फार कमी सिनेमांमध्ये झळकत असली तरी, अभिनेत्री सोशल मीडियावर आणि चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते.

सुपरहीट केजीएफ सिनेमात झळकल्यानंतर अभिनेत्री केजीएफ सिनेमाच्या तिसऱ्या भागात देखील महत्त्वाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रवीनाला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते प्रतीक्षेत आहेत.