अॅशेस मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यात सिडनीच्या मैदानावर ऑस्ट्रेलियाला विजयासाठी फक्त एका विकेटची आवश्यकता होती.
इंग्लंडसाठी स्टुअर्ट ब्रॉड आणि जेम्स अँडरसन सामना वाचवण्याचा प्रयत्न करत होते. अखेरच्या षटकात कॅप्टन कमिन्सने स्टीव स्मिथकडे चेंडू सोपवला.
अँडरसन आणि ब्रॉडची विकेट काढण्यासाठी आक्रमक फिल्डिंग सेट केली. ज्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
इंग्लंडच्या फलंदाजांना चहूबाजूंनी फिल्डर्सनी घेरलं होतं. फक्त एका चुकीची प्रतिक्षा होती. पण असं झालं नाही.
अँडरसन आणि ब्रॉडने इंग्लंडला पराभवापासून वाचवलं. हा सामना इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचा होता.
पण कोलकाता नाईट रायडर्सने ऑस्ट्रेलियन फिल्डिंगचा एक फोटो पोस्ट केला आणि केकेआरचा संघ ट्रोल झाला. नेमकं काय घडलं? काय आहे हे प्रकरण?
केकेआरने ऑस्ट्रेलियाईन फिल्डिंगसोबत आयपीएलमधील एका मॅचचा फोटो पोस्ट केला. ज्यामध्ये केकेआरच्या खेळाडूंनी धोनीला घेरले होते. त्यावेळी धोनी पुणे सुपरजायंट संघाकडून खेळत होता.
पियुष चावलच्या गोलंदाजीवर केकेआरने धोनीसमोर चार फिल्डर उभे केले होते. केकेआरने हा फोटो पोस्ट करताना 'टेस्ट क्रिकेटची क्लासिक रणनीती जी तुम्हाला टी-20 मास्टर स्ट्रोकची आठवन करुन देते' असे कॅप्शन लिहिले होते.
केकेआरच्या या पोस्टचा रवींद्र जाडेजाने चांगलाच समाचार घेतला. त्याने केकेआर फ्रेंचायजीला जोरदार प्रत्युत्तर दिले. त्यानंतर फॅन्सनी केकेआरला चांगलेच ट्रोल केले.
'हा काही मास्टर स्ट्रोक नाही, फक्त देखावा आहे' असे जाडेजाने केकेआरला उत्तर दिलं. जाडेजाचे हे उत्तर टि्वटरवर व्हायरल होत असून चेन्नई सुपर किंग्जचे फॅन्स केकेआरला जोरदार ट्रोल करत आहेत.