चेक पेमेंटसाठी खास सुविधा, ग्राहक फसवणुकीपासून वाचणार
Cheque Payment | रिझर्व्ह बँकेने पॉजिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची फसवणूक टळू शकते. या यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार करणे अधिक सुरक्षित आहे.
Follow us
अलीकडच्या काळात आर्थिक फसवणूक आणि सायबर क्राईमच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे रिझर्व्ह बँक वेळोवेळी नवनव्या उपाययोजना करत असते. आतादेखील रिझर्व्ह बँकेने पॉजिटिव्ह पे सिस्टीम सुरु केली आहे. या सुविधेमुळे ग्राहकांची फसवणूक टळू शकते. या यंत्रणेच्या माध्यमातून पैशांचा व्यवहार करणे अधिक सुरक्षित आहे.
पॉझिटिव्ह पे सिस्टीमच्या माध्यमातून कोणताही चेक वटवला जाण्याच्या आधी त्याची संपूर्ण तपासणी होईल. पॉझिटिव्ह पे सिस्टीम हे एक ऑटोमेटेड डिटेक्शन टुल आहे.
तुम्ही मोबाईलवरून पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा वापर करु शकता. याशिवाय, थेट बँकेचे संकेतस्थळ किंवा एसएमएसच्या माध्यमातूनही बँकेपर्यंत चेकचा तपशील पोहोचवू शकता.
पॉझिटिव्ह पे सिस्टीममधून चेक क्लीअरन्ससाठी पुढे येईल तेव्हा बँक तुम्ही दिलेला तपशील पडताळून पाहिल. यामध्ये काही त्रुटी आढल्यास चेक तुम्हाला परत केला जाईल.
50 हजारापेक्षा अधिक रक्कमेच्या चेक पेमेंटसाठी पॉझिटिव्ह पे सिस्टीमचा वापर केला जाईल. यामुळे चेक क्लीअरन्सची प्रक्रियाही गतिमान होईल.