लिंबूपाणी - हे खूप सोपं आणि थंड पेय आहे. हे पेय तयार करण्यासाठी फक्त एक लिंबू आणि थंड पाण्याची गरज आहे. तुम्ही चवीनुसार मीठ आणि साखर घालू शकता.
कलिंगड ज्यूस – उन्हाळ्यात अनेकांना कलिंगड खायला आवडतं. त्याचा ज्यूस तयार करण्यासाठी तुम्हाला फक्त कलिंगडाचे काही तुकडे मिक्सरमध्ये बारीक करावे लागतील. त्यात तुम्ही लिंबाचा रस आणि बर्फ देखील घालू शकता.
लस्सी - उन्हाळ्यात एक ग्लास गोड लस्सी शरिराला भरपूर शीतलता देते. लस्सी दही आणि थंड पाण्यापासून तयार केली जाते. दही आणि पाणी व्यवस्थित मिक्स करा आणि त्यानंतर आवश्यकतेनुसार त्यात साखर घाला लस्सी तयार.
ताक - लस्सीप्रमाणेच पाणी आणि दह्यापासून ताक तयार केलं जातं. तुम्ही ताक मसालेदार करू शकता. मीठ, भाजलेले जिरे किंवा जिरे पूड, मिरपूड घालून ताक तयार केले जाते.
जलजीरा- हे पेय उन्हाळ्यात सर्वाधिक पसंत केलं जातं. अर्थात हे पेय मसालेदार आणि थंड आहे. थंड पाण्यात पुदीन्याची पानं, कोथिंबिरीची पानं, आले पेस्ट, लिंबाचा रस, कोरडा आंबा पावडर, जिरेपूड, चिंच, हिंग, मीठ, लाल मिरची आणि काळे मीठ आणि थोडी साखर घालून हे पेय बनवले जाते. तुम्ही जलजीरा पावडरचे पॅकेट देखील खरेदी करू शकता.