Photos | पुणे रेल्वे स्थानकावर ‘रेस्टॉरंट ऑन व्हील्स’ सुरु, पाहा काय सुविधा मिळणार ?

मध्य रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे रेस्टॉरंट ऑन व्हील्स सुरु केले होते, त्यास चांगला प्रतिसाद मिळत आहे. हे रेस्टॉरंट रेल्वेच्या जुन्या कोचचा कल्पक वापर करून तयार करण्यात आले होते. सीएमएमटी स्थानकाच्या लांबपल्ल्यांच्या गाड्या सुटणाऱ्या प्लॅटफॉर्म क्रमांक 18 च्या समोर हे रेस्टॉरंट सुरु करण्यात आले आहे. येथे 10 टेबलसह 40 बसण्याची व्यवस्था आहे. मध्य रेल्वेने सीएसएमटी-मुंबई, नागपूर. चिंचवडनंतर विद्यानगरी पुणे येथे 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु केले आहे. चाकावरचे हे उपहारगृह पुणे विभागातील दुसरे रेस्टॉरंट आहे.

| Updated on: Nov 23, 2023 | 2:33 PM
पुणे रेल्वे स्थानकावरील 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स'  100 चौरस मीटर क्षेत्रफळावर बांधण्यात आले असून ताडीवाला रोड परिसरात पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालयाजवळ ते  आहे. रेस्टॉरंट ऑन व्हील्स (ROW) चे व्यवस्थापन आणि संचालन OAM Industries India Pvt.  लिमिटेड ( हल्दीराम ) यांचेकडून केले जात आहे.

1 / 5
पुणे स्थानकातील रेल्वे कोच रेस्टॉरंट येथे खवय्यांना 24 तास स्वादिष्ट अन्न पदार्थ वाढले जाणार आहे. 22 नोव्हेंबर पासुन सुरु झालेल्या या  रेस्टॉरंट ऑन व्हील्स' मध्ये 10 टेबलांसह 40 लोकांची एकावेळी बसण्याची व्यवस्था आहे. या करारामुळे रेल्वेला दरवर्षी 60,00,000/- रुपयांचा महसूल मिळणार आहे.

2 / 5
या रेस्टॉरंटमध्ये टेक अवे काऊंटरवरून प्रवाशांना त्यांच्या ऑर्डर त्वरित देता येतील. तसेच प्रवाशांना या सुविधेचा लाभ विविध ऑनलाइन फूड ऑर्डरिंग ॲप्सद्वारे देखील घेता येणार आहे.

या रेस्टॉरंटमध्ये टेक अवे काऊंटरवरून प्रवाशांना त्यांच्या ऑर्डर त्वरित देता येतील. तसेच प्रवाशांना या सुविधेचा लाभ विविध ऑनलाइन फूड ऑर्डरिंग ॲप्सद्वारे देखील घेता येणार आहे.

3 / 5
राज कचोरी, छोला भटुरा, पाव भाजी, व्हेज थाली आणि कॉम्बो, दक्षिण भारतीय, उत्तर भारतीय, पॅक स्वीट्स आणि नमकीन, चाट, शीतपेये, सॉफ्टी, पारंपारिक भारतीय मिठाई इत्यादींसह मेन्यूचा आनंद प्रवाशांना तसेच सर्वसामान्यांना घेता येणार आहे.

4 / 5
पुणे विभागातील चिंचवड स्टेशनवर पहिले 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु करण्यात आले होते. तसेच आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांतही अशा प्रकारचे  रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्यात येणार आहे.

पुणे विभागातील चिंचवड स्टेशनवर पहिले 'रेस्टॉरंट ऑन व्हील्स' सुरु करण्यात आले होते. तसेच आकुर्डी, बारामती आणि मिरज स्थानकांतही अशा प्रकारचे रेस्टॉरंट ऑन व्हील सुरु करण्यात येणार आहे.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.