IPL 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणाऱ्या वेस्ट इंडिजच्या रोव्हमॅन पॉवेलने एक चक्रावून टाकणारा खुलासा केला आहे. रोव्हमॅन पॉवेल बरोबर असं काही घडलं की, त्याला हॉटेलच्या रुममध्ये अंगाला टॉवेल लपेटून 2-3 दिवस काढावे लागले.
रोव्हमॅन पॉवेलने दिल्ली कॅपिटल्सच्या पॉडकास्टमध्ये हा खुलासा केला. मुंबई एअरपोर्टवर पॉवेलला सांगण्यात आलं की, एअरलाइनकडे त्याचं सामान नाहीय.
पॉवेलचं सामान हरवलं होतं, त्याच्याकडे फक्त एक हँडबॅग होती. पॉवेलकडे कपडे नव्हते. त्यामुळे हॉटेलच्या रुममध्ये अंगाला टॉवेल लपेटून त्याला 2 ते 3 दिवस काढावे लागले.
आयपीएल 2022 च्या मेगा ऑक्शनमध्ये रोव्हमॅन पॉवेलला दिल्ली कॅपिटल्सने 2.80 कोटी रुपये मोजून विकत घेतलं होतं. पण एयरलाइन्सच्या चुकीमुळे हॉटेलमध्ये क्वारंटाइनमध्ये असताना टॉवेलवर रहाव लागलं.
आयपीएल 2022 मध्ये पॉवेलच प्रदर्शन बऱ्यापैकी आहे. त्याने 25.62 च्या सरासरीने 205 धावा केल्या आहेत. पॉवेलचा स्ट्राइक रेट 160 पेक्षा जास्त आहे. त्याने एक अर्धशतक झळकावलं असून दोनवेळा शुन्यावर आऊट झालाय.