
बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान,31 मार्च रोजी ईदच्या निमित्ताने, सलमान खानने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांनी सहभाग घेतला होता. सलमानच्या ईदच्या पार्ट्या बी-टाऊनमधील बहुप्रतिक्षित कार्यक्रमांपैकी एक असतात.

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान त्याच्या 'सिकंदर' चित्रपटामुळे चर्चेत आहे. दरम्यान,31 मार्च रोजी ईदच्या निमित्ताने, सलमान खानने एका भव्य पार्टीचे आयोजन केले होते ज्यामध्ये इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या नावांनी सहभाग घेतला होता. सलमानच्या ईदच्या पार्ट्या बी-टाऊनमधील बहुप्रतिक्षित कार्यक्रमांपैकी एक असतात.

पापाराझींसाठी पोज देताना सलमान खान खूप उत्साहित दिसत होता.

सलमान खानची भाची अलिजेह अग्निहोत्रीही त्याच्या ईद पार्टीत सहभागी झाली होती. काळ्या सूटमध्ये अलिझेह खूपच गोंडस दिसत होती.

सलमान खानच्या ईद पार्टीत बॉबी देओल खूपच स्टायलिश लूकमध्ये पोहोचला. बॉबीने पांढऱ्या रंगाची पँट आणि काळ्या रंगाचा हाफ स्लीव्ह शर्ट घातला होता. त्याने थंब्स अप देऊन पॅप्ससाठी पोझ देखील दिली.

यावेळी बॉबी देओलची पत्नी तान्या देओल देखील खूप सुंदर दिसत होती. तान्याने स्लीव्हलेस ब्लाउजसह प्रिंटेड लाल रंगाची साडी घातली होती.

शमिता शेट्टी देखील पार्टीत उपस्थित होती. तिने पूर्णपणे पांढऱ्या रंगाचा सूट घातला होता.तिने पॅप्ससाठी फोटोसाठी पोजही दिली

सलमान खानची धाकटी बहीण अर्पिता खान लाल रंगाच्या सूटमध्ये खूपच गोंडस दिसत होती.

सलमानची बहीण अलविरा अग्निहोत्रीही पती अतुल अग्निहोत्री आणि मुलासह भाईजानच्या पार्टीत पोहोचली होती.

जॅकी श्रॉफ निळ्या रंगाचा डेनिम जॅकेट, जीन्स आणि टोपी घालून पोहोचले. त्यांनी देखील पॅप्ससाठी खूप फोटो काढले.

सलमान खानच्या पार्टीत नेहा धुपिया आणि अंगद बेदीही पोहोचले होते. यावेळी नेहा काळ्या रंगाच्या ब्लाउजसह ऑफ-व्हाइट साडीमध्ये खूपच सुंदर दिसत होती. अंगदने खाकी रंगाचा कुर्ता घातला होता आणि तोही छान दिसत होता.

दरम्यान या सर्वांमध्ये लक्ष वेधलं ते सलमान खानच्या कथित प्रेयसीने, लुलिया वंतूरने. लुलिया देखील गुलाबी रंगाच्या सूटमध्ये खूप सुंदर दिसत होती.

लग्नानंतरची पहिली ईद साजरी करण्यासाठी सोनाक्षी सिन्हा आणि झहीर इक्बाल देखील भाईजानच्या पार्टीत पोहोचले. यावेळी झहीर सूट आणि बूटमध्ये खूपच डॅशिंग दिसत होता. सोनाक्षी देखील सूट घालून सुंदर दिसत होती.

यावेळी सोहेल खान त्याच्या धाकट्या मुलासोबत दिसला. सोहेलने आपल्या मुलाला मिठी मारताना पॅप्ससाठी पोझ दिली.

नील नितीन मुकेश देखील त्याच्या पत्नीसह सलमान खानच्या ईद पार्टीत पोहोचला होता. यावेळी नील काळ्या रंगाच्या पोशाखात छान दिसत होता.

सिद्धांत चतुर्वेदीही सलमान खानच्या पार्टीत सहभागी झाला होता. यावेळी सिद्धांत पांढऱ्या कुर्त्यात स्टायलिश दिसत होता.