सलमान खान याचा ईशा मालवीय हिच्यावर संताप, खळबळजनक खुलासा
ईशा मालवीय ही बिग बाॅस 17 मध्ये दाखल झालीये. ईशा मालवीय ही मोठ्या वादात सापडल्याचे काही दिवसांपूर्वीच बघायला मिळाले. अनेकांनी ईशा मालवीय हिच्यावर जोरदार टिका देखील केली. ईशा मालवीय आणि हे समीकरण सध्या बिग बाॅसच्या घरात बघायला मिळतंय.
मुंबई : बिग बॉस 17 धमाका करताना दिसत आहे. बिग बॉस 17 ची चाहत्यांमध्ये एक मोठी क्रेझ बघायला मिळतंय. बिग बॉस 17 चा आज विकेंडचा वार पार पडताना दिसत आहे. यावेळी सलमान खान हा घरातील सदस्यांचा क्लास लावताना दिसतोय. सोशल मीडियावर एक प्रोमो तूफान व्हायरल होताना दिसत आहे. या प्रोमोमध्ये सलमान खान हा ईशा हिच्यावर भडकताना दिसत आहे. इतकेच नाही तर सलमान खान याने ईशा हिला आरसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय.
बिग बॉस 17 चा व्हायरल होणारा प्रोमो पाहून लोकही हैराण झाल्याचे बघायला मिळत आहे. बिग बॉस 17 च्या विकेंडच्या वारला सलमान खान हा ईशा हिला बोलू देत नसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. सलमान खान हा ईशा हिला म्हणतो की, तुला वाद आवडतो कारण तुला वाटते की ही मारामारी माझ्यासाठी होत आहे. त्यावर ईशा बोलण्याचा प्रयत्न करते. मात्र, सलमान तिला बोलू देत नाही.
पुढे सलमान खान हा म्हणतो की, बिग बॉस 17 मध्ये येऊन तू तुझे सर्व आयुष्य जगासमोर आणून ठेवले आहेस. इतकेच नाही तर सलमान खान हा ईशा हिच्या गेम प्लॅनचाही खुलासा करताना दिसतोय. कोणतेही नातेबाहेर आणून शोमध्ये कसे राहता येईल आणि कसे दिसता येईल हेच ईशा करत असल्याचे देखील सलमान खान याने म्हटले आहे.
View this post on Instagram
विशेष म्हणजे यावेळी सलमान खान हा अभिषेक याला सपोर्ट करताना देखील दिसला आहे. सलमान खान हा अभिषेक याला म्हणतो की, तू घरात एकटा आहेस. त्यावर उत्तर देताना अभिषेक हा म्हणतो की, मला या दोघांची पण गरज नाहीये. समर्थ हा बिग बॉस 17 मध्ये दाखल होताच ईशा हिने समर्थ हा माझा बॉयफ्रेंड नसल्याचे थेट सांगितले.
इतकेच नाही तर त्यानंतर काही वेळाने ईशा हिने मान्य केले की, समर्थ हा माझा बॉयफ्रेंड तर अभिषेक एक्स बॉयफ्रेंड आहे. यानंतर बिग बॉस 17 मध्ये समर्थ आणि अभिषेक यांच्यामध्ये मोठे वाद होताना दिसले. इतकेच नाही तर थेट हे एकमेकांच्या अंगावर जाताना देखील दिसले. यावेळी घरातील इतर सदस्यांनी यांची भांडणे ही मिटवली.