शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर चेहऱ्यावरील दु:ख लपवताना दिसली सानिया मिर्झा, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल होताच..

| Updated on: Feb 10, 2024 | 1:12 PM

Sania Mirza Video : सानिया मिर्झा ही गेल्या काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळतंय. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांनी नुकताच घटस्फोट घेतलाय. हेच नाही तर शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्रीसोबत निकाह देखील केलाय.

शोएब मलिकसोबतच्या घटस्फोटानंतर चेहऱ्यावरील दु:ख लपवताना दिसली सानिया मिर्झा, तो व्हिडीओ व्हायरल होताच..
Follow us on

मुंबई : सानिया मिर्झा हिच्या आयुष्यामध्ये मोठे वादळ आल्याचे बघायला मिळाले. सानिया मिर्झा आणि पाकिस्तानी क्रिकेटर शोएब मलिक यांचा घटस्फोट झालाय. थेट शोएब मलिक याने त्याच्या तिसऱ्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच मोठा धक्का दिला. शोएब मलिक याने पाकिस्तानी अभिनेत्री सना जावेद हिच्यासोबत निकाह केला. शोएब आणि सना जावेद यांच्या निकाहाचे फोटो हे सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसले. मात्र, सानिया मिर्झा हिच्या चाहत्यांना हे सर्व फोटो पाहून मोठा धक्का बसला. सानिया मिर्झा हिच्या आयुष्यात मोठ्या घडामोडी घडताना दिसल्या.

हेच नाही तर सानिया मिर्झा हिने सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर करत आपल्या आयुष्यात काय सुरू आहे हे देखील सांगितले. आता नुकताच सानिया मिर्झा हिचे काही व्हिडीओ हे सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. नुकताच सानिया मिर्झा ही एका पार्टीमध्ये सहभागी झाली. याचेच हे व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहेत.

यावेळी सानिया मिर्झा ही जबरदस्त लूकमध्ये पार्टीत पोहचली. हेच नाही तर पापाराझी यांना फोटोसाठी पोझ देताना देखील सानिया मिर्झा ही दिसली. सानिया मिर्झा हिच्या चेहऱ्यावर घटस्फोटानंतरचे दु:ख स्पष्टपणे दिसत आहे. हेच नाही तर चेहऱ्यावर स्माईल देऊन दु:ख लपवण्याचा प्रयत्न करताना कुठेतरी सानिया मिर्झा ही दिसली.

सानिया मिर्झा हिच्या घटस्फोटानंतर विविध चर्चा या रंगताना दिसल्या. सानिया मिर्झा आणि शोएब मलिक यांचा एक चार वर्षांचा मुलगा देखील आहे. आता घटस्फोटानंतर दोघे मिळून याचा सांभाळ करणार असल्याचे सांगितले जाते. सानिया मिर्झा ही आपल्या मुलासोबत दुबईमध्ये राहते. हैद्राबादमध्ये अत्यंत शाही पद्धतीने शोएब मलिक आणि सानियाचा निकाह झाला होता.

आता सानिया मिर्झा हिच्या व्हायरल होणाऱ्या या व्हिडीओवर चाहते हे मोठ्या प्रमाणात कमेंट करताना दिसत आहेत. एकाने लिहिले की, खरोखरच घटस्फोट घेतल्यानंतर सानिया मिर्झा हिला दु:ख झाल्याचे बघायला मिळतंय. दुसऱ्याने लिहिले की, खोटी स्माईल देत आहे. असे सांगितले जाते की, शोएब मलिक याचे विवाहबाह्य संबंध असल्यामुळेच सानियाने त्याच्यासोबत घटस्फोट घेतला.