पैठणी साडी त्यावर नथीचा साज, संक्रांतीनिमित्त सोनाली कुलकर्णीचा क्लासी लूक
आज सर्वत्र संक्रांतीचा उत्साह पहायला मिळतोय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संक्रांतीनिमित्त काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आज सर्वत्र संक्रांतीचा उत्साह पहायला मिळतोय. अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने संक्रांतीनिमित्त काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. सगळ्यांना संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Follow us
सोनाली कुलकर्णीने काळ्या रंगाच्या साडीतले फोटो तिच्या इन्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. या काळ्या रंगाच्या साडीत तिचं सौंदर्य खुलुन दिसतंय. या साडीवर तिने मराठमोळा साज केला आहे. सिल्व्हर कलरची नथ आणि गळ्यात त्याला साजेसा हार तिने परिधान केलाय. सोबतच सिव्हर कलरची अंगठी आणि बांगडीही तिने घातली आहे. ज्यामुळे ती अधिकच सुंदर दिसतेय.
‘सूर्याचे तेज मकरसंक्रमणानंतर वाढत जाते तसेच आपले पण तेज (यश, किर्ती) वाढती असो… सर्वांना मकर संक्रांतीच्या मन:पूर्वक शुभेच्छा! तिळगुळ घ्या, गोडगोड बोला…’, असं कॅपशन तिने आपल्या फोटोंना दिलंय.
संक्रातीला तिने ‘सोनाली पैठणी’ने डिझाइन केलेली साडी नेसलीये. फोटो सोबतच एक व्हीडिओही तिने शेअर केला आहे. या व्हीडिओला तिने ‘या संक्रांतीला नेसूनी पैठणी खेळूया झिम्मा’ असं कॅपशन दिलं आहे.
सोनालीचा झिम्मा हा चित्रपट काही दिवसांपुर्वी आला होता. ज्याने बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला. त्यानंतर तिचा भाऊ कदमसोबतच पांडू चित्रपटही गाजला. सोनाली सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असते. आजही संक्रांतीनिमित्त तिने शेअर केलेले फोटो तुम्ही पाहताय.