'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा २८ जुलै रोजी मोठ्या पडद्यावर प्रदर्शित झाला आहे. सध्या सर्वत्र सिनेमाची चर्चा रंगली आहे. बॉक्स ऑफिसवर देखील मोठी कमाई करताना दिसत आहे.
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमा आलिया भट्ट - रणवीर सिंग महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. आता सिनेमावर अभिनेत्री सारा अली खान हिने प्रतिक्रिया दिली आहे.
इन्स्टाग्रामवर अभिनेत्रीने रणवीर याच्यासोबत काही फोटो पोस्ट केले आहेत. रणवीर याच्यासोबत फोटो पोस्ट करत सारा कॅप्शनमध्ये म्हणाली, 'मेरा सिम्बा. सबका रॉकी, दहाडते रहो...' सध्या सोशल मीडियावर अभिनेत्रीची पोस्ट व्हायरल होत आहे.
'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमात सारा अली खान हिने पाहुण्या कलाकाराची भूमिका बजावली आहे. सध्या सर्वत्र 'रॉकी और राणी की प्रेम कहाणी' सिनेमाची चर्चा रंगत आहे.
सारा कायम सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांची संख्या देखील फार मोठी आहे. चाहत्यांच्या संपर्कात राहण्यासाठी अभिनेत्री कायम सोशल मीडियावर स्वतःचे फोटो आणि व्हिडीओ पोस्ट करत असते.