क्रिकेटचा स्टेडियम अन् वाद.. शाहरुख खानवर पुन्हा कारवाई होणार?
अभिनेता शाहरुख खान पुन्हा एकदा स्टेडियमवरील वागणुकीमुळे वादात सापडला आहे. शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यामध्ये तो स्टेडियमवरील व्हिआयपी स्टँडमध्ये उभा राहून स्मोकिंग करत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
Shah Rukh KhanImage Credit source: Instagram
Follow us
बॉलिवूडचा किंग अर्थात अभिनेता शाहरुख खान नुकताच कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध हैदराबाद सनराइजर्सचा (SRH) आयपीएल मॅच पाहण्यासाठी मैदानात पोहोचला होता. आता स्टेडियमवरील शाहरुखचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हा फोटो पाहिल्यानंतर शाहरुख स्टेडियमवर स्मोकिंग करत असल्याचं नेटकऱ्यांनी म्हटलंय. शाहरुखचा हा फोटो नीट पाहिला तर त्याने तोंडाजवळ काहीतरी पकडल्याचं दिसून येत आहे, मात्र ती गोष्ट सिगारेटच आहे की नाही हे स्पष्ट होत नाही. मात्र व्हिआयपी बॉक्समध्ये उभा राहून शाहरुख सिगारेट ओढतोय, अशी कमेंट काहींनी केली आहे.
क्रिकेट स्टेडियमसंदर्भात शाहरुख खानचा हा काही पहिलाच वाद नाही. याआधी त्याच्यावर मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर बंदी घालण्यात आली होती. ग्राऊंडवर शाहरुखने स्टाफसोबत वाद घातला होता, त्यानंतर त्याच्यावर पाच वर्षांपर्यंत बंदी घालण्यात आली होती.
शाहरुखचा हा नवीन व्हिडीओ ईडन गार्डन्स स्टेडियमवरील असून स्मोकिंगच्या घटनेवरून बंगाल क्रिकेट असोसिएशनने त्याच्यावर कारवाई करावी, अशी मागणी काहींनी केली आहे. याप्रकरणी अद्याप शाहरुख किंवा त्याच्या टीमकडून कोणतंच स्पष्टीकरण समोर आलं नाही.
शाहरुखच्या चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, गेल्या वर्षी त्याचे तीन चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाले होते. ‘पठान’, ‘जवान’ आणि ‘डंकी’ या चित्रपटांनी दमदार कमाई केली.