‘शरद पवार म्हणतात, लक्षात असू द्या, माझ्या वाटेला गेलात तर…’ भर सभेत पवारांनी कोणाला दिला इशारा?

Sharad Pawar | आज लोणावळ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात बोलताना शरद पवार यांनी भाजपा, नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. पण आपल्या जुन्या शैलीत एक धडकी भरवणारा सूचक इशारा सुद्धा दिला.

| Updated on: Mar 07, 2024 | 1:27 PM
आज लोणावळ्यामध्ये शरद पवार गटांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा झाला. या मेळाव्याला स्वत: शरद पवार उपस्थित होते. त्यांनी  जाहीर सभेत एका आमदाराला इशारा सुद्धा दिला.

1 / 5
शरद पवार यांनी या मेळाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर खोचक टीका सुद्धा केली. "आज हे सांगतात, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट वाढवतो. गेली दहा वर्षे मोदी सत्तेत आहेत, उत्पन्न वाढलं का? उलट शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढल्या. शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आणली, हीच मोदींनी गॅरंटी दिली" अशी टीका त्यांनी केली.

2 / 5
"आदर्श सोसायटी घोटाळ्यात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांचा हात आहे, असा आरोप भाजपने केला. सातव्या दिवशी ते भाजपमध्ये गेले आणि पंधराव्या दिवशी ते भाजपचे खासदार झाले. राष्ट्रवादी काँग्रेसला भ्रष्टवादी पक्ष म्हणाले. भाजप म्हणजे वॉशिंग मशीन झालेली आहे. आरोप करा आणि त्यांना पक्ष प्रवेश देऊन आरोप धुवून काढा" अशा शब्दात त्यांनी भाजपावर टीका केली.

3 / 5
त्यांनी अजित पवार गटातील आमदार सुनील शेळके यांना भर सभेत इशारा दिला. "मला असं समजलं की, तुम्ही पदाधिकारी आणि कार्यकर्ते इथं येतायत म्हणून धमकी दिली. मी त्यांना सांगू इच्छितो. सुनील शेळके तू आमदार कोणामुळं झाला? तुझ्या सभेला कोण आलं होतं?"

4 / 5
"पक्षाचा अध्यक्ष कोण होतं? तुझ्या त्या अर्जावर माझी सही आहे. हे लक्षात ठेवं. यापुढं असं काही केलं तर मला शरद पवार म्हणतात, हे विसरू नका. मी त्या वाटेने जात नाही, पण गेलो तर मी कोणाला सोडत नाही" असा थेट इशाराचा पवारांनी दिला.

5 / 5
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.