shark tank : अनुपमला आहे महागड्या कारची आवड, सर्वात आवडती गाडी कोणती
shark tank anupam mittal : शार्क टँकमुळे घराघरात गेलेला यशस्वी उद्योजक अनुपम मित्तल याचे व्यक्तीमत्व कसे आहे? याबाबत कुतूहल अनेकांना आहे. त्याला काय आवडते, त्याच्या आवडती गाडी कोणती, याचीही चर्चा होत असते.
1 / 6
टीव्ही शो शार्क टँक फेम आणि शादी डॉट कॉमचे संस्थापक अनुपम मित्तल नेहमी चर्चेत असतात. यशस्वी व्यापारी आणि यशस्वी गुंतवणूकदार म्हणून ते ओळखले जातात. गेल्या काही वर्षांत त्यांनी ओला, फॅब हॉटेल्स, बिग बास्केट, केटो यासह 200 कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे.
2 / 6
15 हजार कोटींच्या मालमत्तेचे मालक अनुपम मित्तल यांचे दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे आलिशान घर आहे. मेहर-नाज हाऊसिंग सोसायटीत अनुपम पत्नी आणि मुलीसोबत राहतात. त्यांच्या घराची किंमत सुमारे 15 कोटी रुपये आहे.अनुपम आणि त्यांची पत्नी आंचल कुमार यांचा दक्षिण मुंबईतील हा बंगला ट्रेंडिंग शैली आणि सजावटीने परिपूर्ण आहे.
3 / 6
फिटनेसबाबत जागरुक असलेल्या अनुपम यांच्या घरात मोठी जिम आहे. अलीकडेच, त्याचा फोटो सोशल मीडियावर आला होता, ज्यामध्ये तो त्याच्या दोन आवडत्या कुत्र्यांसोबत जिममध्ये दिसत होता. अनुपम जिममध्ये नियमित वर्कआउटही करतो.
4 / 6
अनुपम मित्तल यांना कारची खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे जगातील सर्वात आलिशान कार आणि इतर अनेक वाहने आहेत. शिक्षणादरम्यानही त्यांच्याकडे महागडी कार होती.
5 / 6
अनुपम मित्तल यांना कारची खूप आवड आहे आणि त्यांच्याकडे जगातील सर्वात आलिशान कार आणि इतर अनेक वाहने आहेत. शिक्षणादरम्यानही त्यांच्याकडे महागडी कार होती.
6 / 6
अनुपम भारतात आल्यावर त्याने मर्सिडीज-बेंझ घेतली. प्रथम त्याने मर्सिडीजची ई-क्लास कार खरेदी केली आणि नंतर मर्सिडीज-बेंझ एस-क्लास कारची निवड केली. तो म्हणतो की, अनेक वर्षांपासून त्याने फक्त जर्मन लक्झरी कार कंपन्या निवडल्या.मुंबईच्या रस्त्यावर त्याची ऑडी S5 ही आवडती कार आहे. मुंबईत या कारची ऑन-रोड किंमत 1.1 कोटी पासून सुरू होते. अनुपम ही कार क्वचितच चालवतो.