वडिलांच्या मर्जीविना लग्न करतेय सोनाक्षी? शत्रुघ्न म्हणाले, “आजकाल मुलं आईवडिलांना विचारत नाही तर..”

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा ही गेल्या काही काळापासून अभिनेता झहीर इक्बालला डेट करतेय. या जून महिन्यातच हे दोघं लग्नबंधनात अडकणार असल्याचं कळतंय. मात्र याविषयी जेव्हा शत्रुघ्न सिन्हा यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी चकीत करणारं उत्तर दिलं.

| Updated on: Jun 11, 2024 | 9:22 AM
अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांची मुलगी आणि बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाच्या लग्नाच्या चर्चांना उधाण आलं आहे. येत्या 23 जून रोजी सोनाक्षी तिच्या बॉयफ्रेंडशी लग्न करणार असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र या लग्नाबद्दलची माहिती सोनाक्षीच्या वडिलांनाच नसल्याचं कळतंय.

1 / 5
'झूम' या वृत्तवाहिनीशी बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की त्यांना त्यांच्या मुलीच्या लग्नाविषयी काहीच माहीत नाही. जेवढं मी मीडियामध्ये वाचलं, मला फक्त तेवढंच माहीत आहे, असं चकीत करणारं वक्तव्य त्यांनी केलंय.

2 / 5
शत्रुघ्न म्हणाले, "मी सध्या दिल्लीत आहे. निवडणूक निकालानंतर मी इथे आलोय. माझ्या मुलीच्या लग्नाच्या प्लॅन्सविषयी माझं अजून कोणाशी काही बोलणं झालं नाही. तुमचा प्रश्न आहे की ती लग्न करतेय का? तर माझं उत्तर असं आहे की मला तिने अद्याप काहीच सांगितलं नाही."

3 / 5
"मलासुद्धा तितकंच माहीत आहे जितकं मी मीडियामध्ये वाचतोय. जेव्हा ती आम्हाला सांगेल, तेव्हा मी आणि माझी पत्नी त्यांना आशीर्वाद देण्यासाठी जाऊ. ती नेहमी खुश राहावी, हीच आमची इच्छा आहे. आम्हाला आमच्या मुलीच्या निर्णयावर पूर्ण विश्वास आहे. ती कधीच कोणता चुकीचा निर्णय घेणार नाही", असं ते पुढे म्हणाले.

4 / 5
"माझ्या मुलीला तिच्या आयुष्याबद्दल निर्णय घेण्याचा अधिकार आहे. त्यामुळे जेव्हा ती लग्न करेल, तेव्हा वरातीत सर्वांत पुढे मीच नाचताना दिसेन. मला अनेकजण विचारत आहेत की मला लग्नाविषयी काहीच का माहीत नाही? पण मीडियामध्येच सर्वकाही आलंय. मी फक्त इतकंच बोलू शकतो की आजकाल मुलं आईवडिलांना विचारत नाहीत, फक्त सांगतात. आम्हीसुद्धा माहिती मिळण्याची प्रतीक्षा करतोय", अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

5 / 5
Follow us
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.