किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्याचा (shivrajyabhishek) उत्साह पाहायला मिळाला. यावेळी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांचा गौरव करण्यात आला.
यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांना मानपत्र देत त्यांचा गौरव केला.
Follow us
किल्ले रायगडावर 347 व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याचा (shivrajyabhishek) उत्साह पाहायला मिळाला. खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी या निमित्त सर्व शिवभक्तांना शुभेच्छा दिल्या.
खासदार छत्रपती संभाजीराजे यांच्या उपस्थितीत दुर्गराज रायगडावर शिवराज्याभिषेक कार्यक्रम झाला. यावेळी छत्रपती संभाजीराजेंचे सुपुत्रही उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराज मनामनात, राज्याभिषेक घराघरात, असा नारा यंदा छत्रपती संभाजीराजेंनी दिला होता.
कोरोनाचं संकट आणि कोकणातील चक्रीवादळामुळे, शिवभक्तांनी रायगडावर न येता, घरातंच शिवराज्याभिषेक सोहळा साजरा करावा असं आवाहन छत्रपती संभाजीराजेंनी केलं होतं.
छत्रपती संभाजीराजेंच्या या आवाहनानंतर मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत हा सोहळा रायगडावर पार पडला.
यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी पोलीस, डॉक्टर, सफाई कर्मचारी या सर्वांना मानपत्र देत त्यांचा गौरव केला.