शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री अनिल राठोड यांचे निधन झाले. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.
1 / 5
अनिल राठोड यांनी अहमदनगर शहर मतदारसंघात सलग 25 वर्ष लोकप्रतिनिधित्व केले होते. शिवसेनेच्या तिकिटावर 1990 ते 2014 अशा सलग पाच टर्म ते आमदारपदी निवडून आले होते.
2 / 5
अनिल राठोड यांच्या निधनाने जिल्ह्यातील शिवसैनिकांना मोठा धक्का बसला आहे. तर सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दूरध्वनीवरुन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती.
3 / 5
सहकार आणि साखरसम्राटांच्या जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढवण्याचे काम राठोड यांनी केले. राठोड यांची ‘मोबाईल नेता’ अशी ओळख निर्माण झाली होती.
4 / 5
सर्वसामान्यांच्या हाकेला एका फोनवर धावून जात ते लोकांचे प्रश्न सोडवत असत. तसेच सर्वत्र ते ‘भैया’ नावाने प्रसिद्ध होते.