24 वर्षांनंतर झाले विभक्त, खान कुटुंबाशी तोडलं नातं; सलमानच्या भावाला का दिला घटस्फोट?

| Updated on: Jul 27, 2024 | 4:56 PM

सोहैलने 2022 मध्ये सीमा सजदेहला घटस्फोट दिला. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. या दोघांना दोन मुलं आहेत. एका मुलाखतीत सीमा तिच्या आयुष्यातील या कठीण काळाविषयी मोकळेपणे व्यक्त झाली.

1 / 5
अभिनेता सलमान खानचा भाऊ सोहैल खान याने 1998 मध्ये फॅशन डिझायनर सीमा सजदेहशी लग्न केलं होतं. लग्नाच्या 24 वर्षांनंतर या दोघांनी घटस्फोट घेतला. सीमाने एका पॉडकास्ट मुलाखतीत सोहैलसोबतच्या घटस्फोटामागचं कारण सांगितलं होतं.

2 / 5
सीमाने सांगितलं होतं की तीन महिन्यांच्या डेटिंगनंतर ती सोहैलसोबत घरातून पळाली होती. नंतर वयाच्या 22 व्या वर्षी तिने सोहैलशी लग्न केलं होतं. त्या वयात असताना पतीला दुसऱ्या महिलेसोबत पाहिल्यावर खूप असुरक्षितता वाटायची आणि माझ्यावर सोशल दबावही होता, असंही तिने सांगितलं होतं.

3 / 5
सोहैलला घटस्फोट देण्याचा निर्णय कधी घेतला, असा प्रश्न विचारल्यावर सीमा म्हणाली, "ही गोष्ट कोणापासून लपलेली नव्हती की सोहैल आणि मी काही वर्षांपूर्वीच विभक्त झालो होतो. आम्ही सोबत राहतच नव्हतो. मात्र जगाला असं वाटायचं की आम्ही सोबत आहोत."

4 / 5
"एक वेळ अशी होती, जेव्हा मला लग्न आणि मुलगा निर्वाण यांच्यापैकी एकाची निवड करायची होती. माझा मुलगा अशा मार्गी जात होता, ज्याला मी खूप घाबरायचे. एकेदिवसी मला याची जाणीव झाली की माझी सर्व ऊर्जा मी लग्न वाचवण्यात लावावी किंवा माझ्या मुलावर. त्यावेळी मी माझ्या मुलाचा विचार केला", असं तिने सांगितलं.

5 / 5
"घटस्फोटाच्या वेळी फक्त पेपरवर्क बाकी होतं. आमचं नातं तर खूप आधीच संपलं होतं. जेव्हा दोन लोक एका नात्यात खुश नसतात, तेव्हा त्याचा परिणाम मुलांवर पडतो. म्हणूनच मी घटस्फोटाचा निर्णय घेतला.", असंही तिने स्पष्ट केलं होतं. सोहैल खान आणि सीमा सजदेह यांना दोन मुलं आहेत.