काही डीएसपी तर काही कर्नल, या 7 भारतीय खेळाडूंकडे आहेत प्रतिष्ठित सरकारी नोकऱ्या
आज आम्ही तुम्हाला भारतीय क्रिकेट संघातील अशा खेळाडूंबद्दल सांगणार आहोत. ज्यांच्याकडे प्रतिष्ठित नोकऱ्या देखील आहेत. ज्यामध्ये कपिल देव, सचिन तेंडुलकर, महेंद्रसिंग धोनीसह अनेक दिग्गज क्रिकेटपटूंच्या नावांचा समावेश आहे.
Follow us
सचिन तेंडुलकरला भारतीय क्रिकेटमधील महत्त्वपूर्ण योगदानासाठी भारत सरकारने 2010 मध्ये भारतीय हवाई दलात ग्रुप कॅप्टन हे पद बहाल केले होते.
कपिल देव हे पहिले भारतीय कर्णधार आहेत ज्यांच्या नेतृत्वात भारतीय संघाने पहिला विश्वचषक जिंकला होता. 2008 मध्ये त्यांना भारतीय सैन्यात लेफ्टनंट कर्नलची मानद रँक देण्यात आली आहे. तसेच 2019 मध्ये त्यांना हरियाणा स्पोर्ट्स युनिव्हर्सिटीचे पहिले कुलपती म्हणूनही नियुक्त करण्यात आले होते.
माजी भारतीय कर्णधार महेंद्र सिंह धोनी यांच्या कारकिर्दीत भारतीय संघाला अनेक मोठ्या सामन्यात विजेतेपदे मिळवता आले आहे. त्याचे भारतीय लष्करावरील प्रेम पाहता 2011 च्या विश्वचषक जिंकल्यानंतर धोनीला भारतीय लष्कराने लेफ्टनंट कर्नल पद बहाल केले होते.
देशातील सर्वात ग्लॅमरस क्रिकेटपटूंपैकी एक KL राहुल हा भारतीय रिझर्व्ह बँकेत सहाय्यक व्यवस्थापक पदावर आहे. कर्नाटकचा हा अनुभवी खेळाडू उमेश यादव, इशान किशन आणि इतरांसह भारतीय संघात आरबीआयचा चेहरा मानला जातो.
जोगिंदर शर्मा हे नाव 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात चांगलंच गाजलं होतं. पाकिस्तानविरुद्ध शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने भारतीय संघाला विजयी करुन दाखवलं होतं. जो आता हरियाणा पोलिसात डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) म्हणून कार्यरत आहे.
चहल त्याच्या गुगली आणि लेग स्पिनमुळे ओळखला जातो. पण चहल किशोरावस्थेपासूनच बुद्धिबळ चॅम्पियन आहे. हे फार कमी लोकांना माहिती आहे. भारताच्या आयकर विभागाने त्याला आयकर अधिकारी हे पद दिले आहे.
भारतीय फिरकीपटू हरभजन सिंगला पंजाब सरकारने डीएसपी (पोलीस उपअधीक्षक) पदाने सन्मानित केले आहे.