PHOTOS: पृथ्वीवरील सर्वात रहस्यमय ठिकाणं, अजूनही या जागांविषयीच्या गुपितांचा खुलासा नाहीच
पृथ्वीवर अश काही ठिकाणं आहेत जी प्रचंड रहस्यमय आहेत. काही ठिकाणी प्रचंड निसर्ग सौदर्य आहे, तर काही ठिकाणी धडकी भरवणारं भितीदायक वातावरण. या ठिकाणांची अनेक गुपितं असून अजूनही ही गुपितं कायम आहेत. त्यापैकीच काही जागांचा आढावा.
1 / 5
पृथ्वीवर अश काही ठिकाणं आहेत जी प्रचंड रहस्यमय आहेत. काही ठिकाणी प्रचंड निसर्ग सौदर्य आहे, तर काही ठिकाणी धडकी भरवणारं भितीदायक वातावरण. या ठिकाणांची अनेक गुपितं असून अजूनही ही गुपितं कायम आहेत. त्यापैकीच काही जागांचा आढावा.
2 / 5
मॅग्नेटिक हिल लडाख : लडाखमधील या रहस्यमय ठिकाणी तुम्ही तुमचा गाडी केवळ उभी केली तरी ती आपोआप उंचाकडे जायला लागते. यामागे वेगवेगळी कारणं असल्याचं सांगितलं जातं. वैज्ञानिकांमध्ये देखील यावर एकमत होऊ शकलेलं नाही. त्यामुळेच अजूनही या ठिकाणाच्या रहस्यांचा खुलासा झालेला नाही.
3 / 5
भितीदायक बाहुल्यांचा आयलंड : तुम्हाला भितीदायक ठिकाणं बघायला आवडत असतील तर मॅक्सिकोचं डाल्स आयलंड तुम्हाला वेगळा अनुभव देईल. येथील बाहुल्या एकमेकांशी बोलतात अशीही दंतकथा स्थानिकांमध्ये आहेत. पर्यटकांना या ठिकाणी भेटायला गाईड घेण्यास सांगितलं जातं. एकट्याला इथं जाऊन दिलं जात नाही.
4 / 5
डानाकिल डिप्रेशन : उत्तर इथिओपिया नावाच्या देशातील या ठिकाणाला तुम्ही पृथ्वीवरील नरक म्हणू शकता. येथे जीवंत ज्वालामुखीच्या सातत्याने हालचाली सुरू असतात. या ठिकाणी इतकी उष्णता असते की तेथे जाणेही जीवघेणे ठरु शकते.
5 / 5
गीजाचं पिरॅमिड: हे ठिकाण अद्भुत कलाकृती आणि विशाल आकारामुळे आजही वैज्ञानिकांसाठी रहस्य बनलंय. या पिरॅमिडमध्ये अशी अनेक गुपितं आहेत ज्याविषयी शास्त्रज्ञांनाही माहिती नाही.