हॉट अँड ब्युटीफूल सोनल चौहान सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. नुकतीच तिने तिच्या सोशल रेड ग्लीटर साडीमध्ये फोटो शेअर केले आहेत. अभिनेत्री सोनल चौहाननं आपल्या करिअरची सुरुवात हिमेश रेशमिया यांच्या 'आप का सूरूर' या गाण्यातून केली होती.
2008 मध्ये सोनलने जन्नत या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात सोनलसोबत इमरान हाश्मी मुख्य भूमिकेत होते.जन्नत चित्रपटासाठी सोनल चौहानला फिल्मफेअरचा सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार मिळाला होता.
त्यानंतर, सोनल काही काळानंतर 2012 मध्ये ‘पहला सितारा’ या चित्रपटात दिसली. यादरम्यान तिनं तेलगू आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं.यानंतर सोनल ‘थ्री जी’ या चित्रपटात झळकली. यादरम्यान सोनलला फारसा चांगला प्रतिसाद मिळाला नाही.
हिंदी इंडस्ट्रीत चांगला प्रतिसाद न मिळाल्यामुळे सोनम पुन्हा साऊथ इंडस्ट्रीत सक्रिय झाली आहे.अभिनयाशिवाय सोनल एक उत्तम गायिकाही आहे. सोनलने थ्री जी या चित्रपटात ‘कैंसे बताये तुम्हे’ हे गाणं गायलं होतं.
सोनल तिच्या सोशल मीडियावर तिचे फोटो अपलोड करत असते. तिचे चाहते तिच्या फोटोवर लाईक्स आणि अनेक कमेंट्स करत असतात.