PHOTO : IPL गाजवल्यानंतर एकदिवसीय संघात पदार्पण, एकाच वेळी पाच नव्या चेहऱ्यांची भारतीय संघात एन्ट्री

श्रीलंका संघाविरुद्धच्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यांत भारतीय संघातून एकाच वेळी 5 खेळाडूंनी पदार्पण केले आहे. 1980 नंतर पहिल्यांदाच अशाप्रकारे भारतीय संघात एकावेळी पाच खेळाडू डेब्यू करत आहेत.

| Updated on: Jul 23, 2021 | 6:26 PM
भारतीय संघातून श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या सामन्यात पदार्पण करणाऱ्या सर्व खेळाडूंनी आयपीएल गाजवली आहे. आयपीएलमध्ये स्वत:ला सिद्ध केल्यामुळेच या सर्वांना आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये स्थान मिळालं आहे. अशाप्रकारे एकाचवेळी भारतीय संघात 5 खेळाडूंनी पदार्पण 1980 च्या डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियया दौऱ्यावेळी केलं होतं. त्यावेळी किर्ती आझाद, दिलीप जोशी, रॉजर बिनी, संदीप पाटील आणि तिरुमलाई श्रीनिवासन यांना संघात संधी देण्यात आली होती.

1 / 6
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात संघात पदार्पण करणाऱ्या संजू सॅमसनला (Sanju Samson) दुखापत झाल्यामुळे इशान किशनला संधी देण्यात आली. मात्र आता दुखापत ठिक झाल्याने संजूने तिसऱ्या सामन्यात संघात पदार्पण केले. संजू सध्या आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार असून काही महिन्यांपूर्वीच त्याने भारताच्या टी-20 संघातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं.

2 / 6
यावेळी संघात स्थान देण्यात आलेल्या खेळाडूंमध्ये फलंदाज म्हणून नितिश राणाला (Nitsh Rana) संधी देण्यात आली आहे. मागील काही वर्षे कोलकाता नाईट रायडर्स संघाचा (KKR) महत्त्वाचा फलंदाज असणाऱ्या राणाने आय़पीएलमध्ये चांगली कामगिरी केली आहे. त्याने 2020 च्या आयपीएलमध्ये 14 मॅचेसमध्ये 352 धावा ठोकल्या आहेत. तर यावर्षी आतापर्यंत झालेल्या सामन्यात राणाने 201 धावा केल्या आहेत.

3 / 6
डावखुरा वेगवान गोलंदाज  चेतन साकरियाने (Chetan Sakariya) यंदाची आयपीएल चांगलीच गाजवली होती. 2021 मध्ये  राजस्थान रॉयल्स संघातून पदार्पण करणाऱ्या चेतन अप्रतिम कामगिरीमुळे राजस्थानचा महत्त्वाचा खेळाडू बनला. पण मागील 5 ते 6 महिन्यांत चेतनचा भाऊ आणि वडिल दोघांचाही मृत्यू झाल्यामुळे त्याच्यावर दुखाचा डोंगर कोसळला होता. या सर्वानंतर आता जाऊन कुठे चेतनचं आयुष्य रुळावर येत आहे. सौराष्ट्र संघाच्या या खेळाडूने  23 टी-20 सामन्यांत 35 विकेट पटकावले आहेत.

4 / 6
आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सने रेकॉर्डब्रेक 9.25 कोटींना विकत घेतलेल्या कृष्णप्पा गौतम (Krishnappa Gowtham) याने देखील आज भारतीय संघात पदार्पण केले. यंदाच्या आयपीएलमध्ये अष्टपैलू गौथमला अधिक सामने खेळता आले नाहीत मात्र स्थानिक क्रिकेटमधील त्याची कामगिरी अप्रतिम आहे. त्याने 47 प्रथम श्रेणी सामन्यांत 70 विकेट्स मिळवले आहेत. तर 558 धावाही केल्या आहेत. तर 62 टी-20 सामन्यांत 41 विकेट घेत 594 धावा केल्या आहेत.

5 / 6
मुंबई इंडियन्स संघाचा महत्वाचा गोलंदाज असणाऱ्या राहुल चहरने (Rahul Chahar) देखील आज एकदिवसीय संघात पदार्पण केले आहे. त्याने भारताच्या टी-20 संघात याआधीच पदार्पण केले होते. त्याने तीन सामनेही खेळले आहेत.

6 / 6
Follow us
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?
खातेवाटपानंतर 'मीच होणार पालकमंत्री', ठाणे, पुण्याचं पालकत्व कोणाकडे?.
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर...
मराठी कुटुंबाला मारहाण, चिमुकलीसोबत अश्लील चाळे, विचारणा केली तर....
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?
'उदय सामंत यांना पालकमंत्रीपद मिळालं तर...', योगेश कदम काय म्हणाले?.
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्...
शहापुरात गोळीबार, महालक्ष्मी ज्वेलर्सबाहेर खळबळ, एकाचा मृत्यू अन्....
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?
मंत्री बनताच शिवसेनेचा बडा नेता अ‍ॅक्शन मोडवर,सत्तारांवर कारवाई करणार?.
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र
‘जर्सी क्रमांक 99 मिस..’; आर अश्विनच्या निवृत्तीवर मोदींचं भावनिक पत्र.
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला
'त्यांनी पंतपप्रधान व्हावं', सरकारमधील मंत्र्यांच्या भुजबळांना टोला.
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती
जरांगेंचं पुन्हा उपोषणाचं शस्त्र, सरकारमधील मंत्र्यानं केली एकच विनंती.
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद
भाच्याच्या लग्नात ठाकरे बंधू एकत्र, लग्नात राज-उद्धव ठाकरेंमध्ये संवाद.
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?
पुण्यातून शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीसांना फोन, कारण नेमकं काय?.