तब्बल 17 वर्षे बार्सिलोना संघाकडून अप्रतिम खेळ केल्यानंतर लिओनल मेस्सीने (Lionel Messi) काही दिवसांपूर्वी बार्सिलोना संघासोबतचा करार वाढवण्यावर सहमती न झाल्याने संघ सोडला. जगातील अव्वल दर्जाचा फुटबॉलपटू मेस्सी कोणत्या संघात जातो याबद्दल सर्वांनाच उत्सुकता होती. ही उत्सुकता अखेर मंगळवारी संपली. (सौैजन्य - PSG Instagram)
मंगळवारी मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघात प्रवेश केला. पुढील दोन वर्षांसाठी मेस्सी फ्रान्समधील या क्लबकडून खेळताना दिसणार आहे.(सौैजन्य - PSG Instagram)
मेस्सीने पॅरीस सेंट जर्मन संघासोबत पुढील दोन वर्षांसाठी करार केला आहे. त्याला तब्बल 4 कोटी 10 लाख डॉलर्स इतक्या रकमेला पीएसजीने करारबद्ध केलं आहे.(सौैजन्य - PSG Instagram)
34 वर्षीय फुटबॉल स्टार मेस्सी दाखल झालेल्या पीएसजी संघात नेयमासह फ्रान्सचा स्टार खेळाडू कायलिन एम्बाप्पेही आहे. काही दिवंसापूर्वीच रिअल मॅड्रीड संघातून बाहेर पडलेला सर्जिओ रामोसही याच संघात गेल्याने आता हा संघ जागतिक फुटबॉलमधील एक बलाढ्य संघ बनला आहे.(सौैजन्य - PSG Instagram)
लिओनल मेस्सी पीएसजी संघात दाखल होताच सोशल मीडियावर फक्त त्याच्याच फोटोजचा पाऊस पडत होता. जगभराती करोडो मेस्सी फॅन्स त्याचे नव्या जर्सीतील फोटो शेअर करत होते. (सौैजन्य - PSG Instagram)