भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी मागच्या वर्षी विश्वचषकातील अखेरच्या सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला. त्यातच यंदा आयपीएलही कोरोनाच्या संकाटमुळे रद्द झाल्याने धोनी त्याच्या फार्महाऊसवर फॅमिलीसोबत वेळ घालवत आहे (Indian Cricket team former Captain MS Dhoni Farm House Photos with sakshi Dhoni)
धोनी सध्या राहत असलेलं फार्म हाऊस हे रांचीजवळ असून त्याच्या फार्महाऊसच नाव 'कैलाशपति' असं आहे. या फार्महाऊसवर बऱ्याच प्रकारची झाड आहेत. ज्यात फळांपासून ते भाज्यांपर्यंत सारंच आहे.
धोनीची पत्नी साक्षी तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या फार्म हाऊसचे बरेच फोटो टाकते. ज्यात धोनी त्याची मुलगी जीवा तसेच त्यांचे पाळीव प्राणीही असतात.
धोनीच्या या फार्महाऊसवर विविध प्रकारचे कुत्रे, गायी, घोडे अशा प्रकारचे पाळीव प्राणी आहेत. धोनीच्या सर्व मोटरबाईक्सही या ठिकाणीच आहेत. विशेष म्हणजे या फार्महाउसच एक वेगळ इन्स्टाग्राम पेज असून साक्षी आणि माही दोघेही ते फॉलो करतात.
काही दिवसांपूर्वीच धोनीने त्याच्या इन्स्टाग्रामवर फार्म हाऊसचा एक व्हिडीओ टाकला होता. ज्यात तो स्ट्रॉबैरी तोडून खाताना दिसत होता.