भारतीय पुरुष संघाप्रमाणे भारतीय महिला क्रिकेट टीमही (Indian Women Cricket Team) सध्या इंग्लंडच्या दौऱ्यावर आहे. एकमेव कसोटी सामना ड्रॉ झाल्यानंतर आताभारत आणि इंग्लंडच्या रणरागिनींमध्ये एकदिवसीय सामन्यांची मालिका रंगली आहे. ज्यात पहिल्या दोन्ही सामन्यांत फलंदाजांच्या सुमार कामगिरीमुळे भारत पराभूत झाला आहे.दरम्यान दोन्ही सामन्यात कर्णधार मिताली राजने (Mithali Raj) ठोकलेल्या अर्धशतकांचा तिला चांगला फायदा झाला असून तिने इंग्लंडमध्ये सर्वाधिक वेळा 50 किंवा त्याहून अधिक धावा करण्याचा रेकॉर्ड केला आहे. तिने रोहित शर्मा (Rohit Sharma), विराटसह (Virat Kohli) अनेक दिग्गजांना मागे टाकले आहे.