टीचर आणि स्टुडंट यांची लवस्टोरी असं ऐकायला थोडं विचित्र वाटत असेल पण टीम इंडियाच्या एका खेळाडूबाबत तसं काहीसं घडलं आहे. नाही म्हणजे हे टीचर आणि विद्यार्थी शाळेचे नाहीत, तर डान्स क्लासचे आहेत. टीम इंडियाचा लेग स्पिनर युजवेंद्र चहल याचा आपल्या डान्स टिचरवरच जीव भाळला. या डान्स टिचरचं नाव धनश्री असं आहे आणि ती युजवेंद्रची पत्नी आहे. त्यांचं लॉकडाऊनमध्ये प्रेम प्रकरणाला सुरुवात झाली, ती नेमकी कशी झाली त्याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
कोरोना काळात लॉकडाऊन दरम्यान युजवेंद्र चहलची डान्स शिकण्याची इच्छा झाली. याच निमित्ताने त्याची धनश्री सोबत ओळख झाली. युजवेंद्रचा डान्स क्लास ऑनलाईन सुरु झाला. त्यानंतर धनश्री आणि त्याच्यातील संवाद वाढला. याच संवादातून त्यांचं एकमेकांवर प्रेम झालं.
युजवेंद्र आणि धनश्री यांनी लग्न करायचं ठरवलं. दोघांनी लॉकडाऊन काळात लग्न करत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर अनेकांना धक्का बसला. त्यानंतर दोघांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला.
युजवेंद्र आणि धनश्री 22 डिसेंबर 2020 रोजी लग्नबंधनात अडकले. धनश्रीला अनेकदा युजवेंद्र सोबत बघितलं गेलं.
धनश्री तिच्या डान्समुळे प्रसिद्ध आहे. तिने अभिनेता कार्तिक आर्यन आणि गुरु रंधवा सोबतही काम केलं आहे. याशिवाय ती एक डेंटिस्टही आहे. तिने नवी मुंबईतील डी. वाय. पाटील विद्यापीठातून शिक्षण घेतलं आहे. धनश्री तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाउंटवर तिच्या डान्सचे अनेक व्हिडीओ शेअर करत असते.