MI vs RCB : विजय मिळवून दिल्यानंतर पॅव्हिलियनमध्ये चाललेल्या सूर्यकुमार यादवसोबत विराट कोहलीने केलं असं
MI vs RCB IPL 2023: सूर्यकुमार यादवने आरसीबी विरुद्धच्या महत्त्वपूर्ण सामन्यात चमकदार कामगिरी केली. 16व्या षटकात मॅच-विनिंग कामगिरी करत बाद झाला. पाहा विराट कोहलीने पॅव्हेलियनमध्ये जाताना नेमकं काय केलं?
![इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेतील सुरुवातीच्या सलग पराभवानंतर मुंबई इंडियन्सनं जबरदस्त पुनरागमन केलं आहे.गुणतालिकेत मुंबई इंडियन्स संघ आता तिसर्या स्थानावर आहे. तसेच प्लेऑफच्या दिशेन एक पाऊल टाकलं आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190127/RCB_vs_MI_Suryakumar_1.jpg?w=1280&enlarge=true)
1 / 9
![200 धावांचं लक्ष्य असतानाही मुंबई इंडियन्सने सहज विजय मिळवला. मुंबईच्या खेळाडूंनी आयपीएल 2023 मध्ये अशी कामगिरी तीनदा केली आहे. 200 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईने मंगळवारी वानखेडे स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्धचा सामना सहज जिंकला.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190129/RCB_vs_MI_Suryakumar_2.jpg)
2 / 9
![सूर्यकुमार यादवने स्फोटक फलंदाजी करत संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. सूर्यकुमार यादवने केवळ 35 चेंडूंत 7 चौकार आणि 6 षटकारांसह 83 धावा केल्या.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190130/RCB_vs_MI_Suryakumar_3.jpg)
3 / 9
![मुंबई इंडियन्सला विजयाच्या उंबरठ्यावर आणल्यानंतर सूर्यकुमार 16 व्या षटकात विजयकुमारच्या गोलंदाजीवर बाद झाला. केदार जाधवने त्याचा झेल घेतला. सूर्यकुमार आऊट झाल्यावर मुंबई संघाने डगआऊटने उभे राहून टाळ्या वाजवून स्वागत केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190131/RCB_vs_MI_Suryakumar_4.jpg)
4 / 9
![सूर्यकुमार पॅव्हेलियनकडे जात असताना विराट कोहलीने त्याला मिठी मारली आणि शुभेच्छा दिल्या. सामना संपल्यानंतरही कोहलीने सुर्याच्या कामगिरीचे कौतुक करत त्याला पुन्हा मिठी मारली. त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190132/RCB_vs_MI_Suryakumar_5.jpg)
5 / 9
![विराट कोहलीने सूर्यकुमार यादवशी हस्तांदोलन करत शानदार खेळाचे कौतुक केले.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190134/RCB_vs_MI_Suryakumar_6.jpg)
6 / 9
![सामन्यानंतर सूर्यकुमार यादव म्हणाला की, या सामन्यातील विजय गुणांच्या दृष्टीने आमच्यासाठी खूप महत्त्वाचा होता. घरच्या मैदानावर सामना जिंकलो आहोत. जितका सराव कराल तितके सामन्यात खेळणे सोपे जाईल.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190135/RCB_vs_MI_Suryakumar_7.jpg)
7 / 9
![आरसीबीचा कर्णधार फाफ डुप्लेसिसनेही सूर्यकुमारच्या खेळाचे कौतुक केले. सूर्यकुमारची फलंदाजी चमकदार होती. त्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे."सूर्या जर तो स्थिर झाला आणि स्फोटक खेळाकडे गेला तर त्याला थांबवता येणं कठीण आहे."](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190136/RCB_vs_MI_Suryakumar_8.jpg)
8 / 9
![या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना ग्लेन मॅक्सवेलच्या 68 धावा आणि डुप्लेसिसच्या 65 धावांच्या जोरावर आरसीबीने 6 गडी गमावून 199 धावा केल्या. सूर्यकुमार (83) आणि नेहल वढेरा (नाबाद 52) धावांच्या जोरावर मुंबईने हे लक्ष्य 16.3 षटकात पूर्ण केलं.](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2023/05/10190137/RCB_vs_MI_Suryakumar_9.jpg)
9 / 9
![त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ? त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-ayurvedic-powder-for-health-1.jpg?w=670&ar=16:9)
त्रिफळा चूर्ण कोणत्या वेळी पिणे उत्तम असते ?
![मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं? मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/is-it-bad-luck-to-keep-ashes-in-the-house-hindu.jpg?w=670&ar=16:9)
मृत व्यक्तीच्या अस्थी घरात ठेवल्याने काय होतं?
![करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-1234-2.jpg?w=670&ar=16:9)
करीना कपूरच्या फेव्हरेट अन् प्रोटिन्सने भरपूर असणाऱ्या सिंधी कढीची झटपट रेसिपी
![जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-treasure-pics-1024x682-1.jpg?w=670&ar=16:9)
जगातील 5 रहस्यमयी खजिने, जे मिळवण्याचा ज्याने प्रयत्न केला त्याचा झाला मृत्यू
![कोंबडी दिवसाला किती अंडी देते? कोंबडी दिवसाला किती अंडी देते?](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/a-hen-lay-in-one-day.jpg?w=670&ar=16:9)
कोंबडी दिवसाला किती अंडी देते?
![चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या](https://images.tv9marathi.com/wp-content/uploads/2025/02/cropped-chinese-currency-cny.jpg?w=670&ar=16:9)
चीनमध्ये भारताच्या 100 रुपयाची काय किंमत? जाणून घ्या