दारोदार पेपर टाकले, गाड्या धुवून कमाई, 24 व्या वर्षी मिस्टर इंडिया, मनोज पाटीलची कारकीर्द कशी बहरली?

अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे

| Updated on: Sep 16, 2021 | 12:19 PM
मिस्टर इंडिया मनोज पाटील (Mr India Manoj Patil) याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. विषारी गोळ्या खाऊन 29 वर्षीय मनोजने आपलं आयुष्य संपवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे.

1 / 9
बुधवारी रात्री उशिरा कुटुंबियांनी त्याला मुंबईतील कूपर रुग्णालयात दाखल केलं. सध्या मनोजची तब्येत स्थिर असल्याची माहिती आहे. बॉलिवूड अभिनेता साहिल खान (Sahil Khan) याच्या त्रासाला कंटाळून मनोज पाटीलने हे पाऊल उचलल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

2 / 9
मनोज पाटीलने 2016 मध्ये 'मिस्टर इंडिया मेन्स फिजिक ओव्हरऑल चॅम्पियनशिप' (Mr India Men's Physique Overall Championship) हा किताब पटकावला होता. तो एक सुप्रसिद्ध मॉडेल, अॅथलीट आणि ट्रेनरही आहे. प्रतिकूल परिस्थितीतही आपल्या स्वप्नांचा मागोवा घेत तो इतरांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.

3 / 9
मनोजचा जन्म 1992 मध्ये एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांने वयाच्या 13 व्या वर्षीच आपल्या कुटुंबासाठी कमाई करण्यास सुरुवात केली होती. आधी तो वर्तमानपत्र दारोदार जाऊन वितरित करायचा, दूध विकायचा आणि गाड्याही धुवायचा. तेव्हा महिन्याला अंदाजे 400 ते 500 रुपये तो कमवत होता.

4 / 9
त्याने दररोज व्यायाम करणाऱ्‍या आपल्या भावाकडून प्रेरणा घेतली आणि वयाच्या 16 व्या वर्षी मनोजने जवळच्या जिममध्ये वर्कआऊट करण्यास सुरुवात केली.

5 / 9
वयाच्या 18 व्या वर्षी त्याला शरीरसौष्ठव स्पर्धांबद्दल माहिती मिळाली आणि काही स्पर्धांमध्ये त्याने भाग घेण्यास सुरुवात केली. पण पदरी आलेल्या अपयशाने तो खचून गेला नाही, तर त्याने येत्या काही वर्षांत अधिक मेहनत घेण्यास सुरुवात केली

6 / 9
वयाच्या 20 व्या वर्षी मनोज पाटीलने 8-10 स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि काही किताब जिंकले, परंतु तरीही तो मुख्य विजेतेपदांपासून दूरच होता. 21 व्या वर्षी त्याने ज्युनियर मिस्टर मुंबई स्पर्धेत भाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले, ज्यामुळे त्याचे मनोबल उंचावले. पुढे त्याने मिस्टर महाराष्ट्रमध्ये सहभागी होत रौप्य पदक पटकावले.

7 / 9
मनोजला मेन्स फिजिक स्पर्धेबद्दल माहिती मिळाली आणि त्याने त्याविषयी गुगल आणि यूट्यूबवर संशोधन सुरू केले. त्याने तिथून तांत्रिक बाबी जाणून घेतल्या आणि 2015 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिकमध्ये भाग घेतला, पण तो टॉप 15 मध्ये प्रवेश करू शकला नव्हता. तेव्हाच त्याने ठरवले, की पुढच्या वर्षी तो नक्कीच विजेतेपद पटकावेल. म्हणून त्याने कठोर परिश्रम करण्यास सुरवात केली आणि त्याच्या मेहनतीचे फळ त्याला पुढच्या वर्षी मिळाले. मनोजने 2016 मध्ये मिस्टर इंडिया मेन्स फिजिक स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.

8 / 9
साहिल खानविरोधात याआधी मनोजने पोलिसांना लिहिलेल्या तक्रार पत्रात केल्याचं समोर आलं आहे. अभिनेता साहिल खान माझ्यावर जळतो, साहिल माझ्या न्युट्रिशन शॉपविषयी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून अपप्रचार करतो, तसेच माझं करिअर संपवण्याची धमकी देतो, असा आरोप मनोजने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत आहे

9 / 9
Follow us
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.