PAK vs AUS: 19 वर्षीय वेगवान गोलंदाजाचा पाकिस्तानी संघात समावेश, वयाच्या 17 व्या वर्षी रचला होता इतिहास!

| Updated on: Mar 02, 2022 | 9:34 AM

पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच गोलंदाजांचा तंदुरुस्ती चिंतेचा विषय आहे. 1 मार्च रोजी, हसन अली आणि फहीम अश्रफ दुखापतींमुळे बाहेर पडल्यानंतर टीमचा आणखी एक वेगवान गोलंदाज हारिस रौफ कोरोना संसर्गामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला.

1 / 4
पाकिस्तान क्रिकेट संघासाठी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वीच गोलंदाजांचा तंदुरुस्ती चिंतेचा विषय आहे. 1 मार्च रोजी, हसन अली आणि फहीम अश्रफ दुखापतींमुळे बाहेर पडल्यानंतर टीमचा आणखी एक वेगवान गोलंदाज हारिस रौफ कोरोना संसर्गामुळे पहिल्या कसोटीतून बाहेर पडला. आता रौफऐवजी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने 19 वर्षीय वेगवान गोलंदाज नसीम शाहचा संघात समावेश केला आहे.

2 / 4
या मालिकेसाठी नसीम शाहला पाकिस्तानी संघात राखीव म्हणून ठेवण्यात आले होते, मात्र रौफला कोरोनाची लागण झाल्यानंतर आता त्याला मुख्य संघात स्थान देण्यात आले आहे. नसीमचा सध्या फक्त पहिल्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आला आहे. जो शुक्रवार 4 मार्चपासून सुरू होणार आहे.

3 / 4
वेगवान खेळासाठी ओळखल्या गेलेल्या या उजव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने अवघ्या अडीच वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. ब्रिस्बेन येथे झालेल्या त्या कसोटीत पाकिस्तानला केवळ एका डावात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली आणि त्यामुळे नसीमला केवळ 1 बळी घेता आला.

4 / 4
नसीम शाहच्या नावावर सर्वात तरुण कसोटी हॅटट्रिकचा विक्रम आहे. या गोलंदाजाने फेब्रुवारी 2020 मध्ये बांगलादेशविरुद्ध चौथ्या कसोटी सामन्यात हॅट्ट्रिक घेत इतिहास घडवला. नसीम हा कसोटी हॅट्ट्रिक घेणारा सर्वात तरुण गोलंदाज ठरला. नसीमने 9 कसोटी सामन्यात केवळ 20 विकेट्स घेतल्या आहेत. त्याने वर्षभरापूर्वी जानेवारी 2021 मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता.