12 सामन्यात 39 चौकार आणि 22 षटकार, दीड वर्षात धुमशान, 5 वर्षांपासून संघाबाहेर असलेल्या खेळाडूला बोलावणं!
पाकिस्तान संघातील आघाडीचा खेळाडू सोहेब मकसूद याने सुमारे पाच वर्षानंतर पाकिस्तान क्रिकेट संघात पुनरागमन केले.तो अखेर 2016 मध्ये पाकिस्तानकडून खेळला होता.
1 / 5
पाकिस्तान क्रिकेट संघात जवळपास पाच वर्षांनी एका खेळाडूनं पुनरागमन केलं आहे. या खेळाडूचे नाव आहे सोहेब मकसूद... 2016 साली तो शेवटचं पाकिस्तान संघाकडून खेळला होता त्यानंतर तो संघाबाहेर झाला. पाकिस्तान सुपर लीग मध्ये त्यांने धावांचा पाऊस पडला आणि त्याच्यासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाची दार उघडी झाली. त्याच्या शानदार खेळीमुळे सुलतान मुलतान संघाला पहिल्यावेळी पीएसएलचं विजेतेपद मिळालं. आता सोहेल मकसूद पाकिस्तान संघातून इंग्लंड आणि वेस्ट इंडिज दौऱ्यावर जाणार आहे.
2 / 5
सोहेल मकसूदचा खेळ 2020 नंतर एकदमच बदलला. जानेवारी 2020 नंतर पाकिस्तानी फलंदाजांमध्ये त्याचा स्ट्राईक रेट सर्वाधिक होता. त्याने 20 डावांत 500 पेक्षा अधिक धावा केल्या. t20 वर्ल्ड कप तोंडावर आलेला असताना तो खोऱ्याने धावा ओढतोय. त्यामुळे पाकिस्तानी संघाचा आता चिंता नाही. पाकिस्तानच्या विस्फोटक फलंदाजांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. 2015 च्या पाकिस्तान वर्ल्डकप संघाचा मकसूददेखील हिस्सा होता.
3 / 5
पाकिस्तान सुपर लीग मध्ये सर्वाधिक रन्स करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत मकसूदचं नाव तिसऱ्या क्रमांकावर आहे. बाबर आझम आणि मोहम्मद रिजवान याच्यानंतर सर्वाधिक रन्स करणारा फलंदाज म्हणून मकसूदची नोंद आहे. त्याने 12 मॅचमध्ये 47.5 धावांच्या सरासरीने आणि 156. 70 च्या सरासरीने 428 रन्स ठोकले आहेत. या टूर्नामेंट मध्ये त्यांने 39 चौकार आणि 22 षटकार लगावले. यामध्ये बाबर आझम पेक्षा त्याचा स्ट्राईक रेट उत्तम होता.
4 / 5
वर्ष 2020 नंतर त्याच्या खेळात कमालीचा बदल झाला. 2020 नंतर त्याने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 455 धावा केल्या. या दरम्यान त्याची सरासरी 45.50 तर स्ट्राईक रेट 128. 16 इतका होता. 2020 पूर्वी त्याने याच फॉरमॅटमध्ये 3639 धावा केल्या.
5 / 5
सोहेल मसूद याने 26 एकदिवसीय सामन्यात 735 धावा केल्या आहेत तर 20 टी-20 सामन्यात 221 रन्स केल्या आहेत. 2013 मध्ये त्याने पाकिस्तान क्रिकेट संघात पदार्पण केलं होतं. खरंतर त्याला कसोटी क्रिकेट खेळण्याची त्याची इच्छा होती परंतु त्याला एकदिवसीय आणि टी-20 संघात प्रवेश मिळाला. खराब प्रदर्शनानंतर टी-20 आणि एकदिवसीय संघातून त्याला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. परंतु आता पीसीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर पाकिस्तानची क्रिकेट संघाची दारे त्याच्यासाठी उघडी झाली आहेत.