भारताला आयसीसीच्या तिन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये जेतेपद मिळवून देणारा एकमेव कर्णधार म्हणजे महेंद्र सिंह धोनी. धोनीला मोटरबाईक्सची खूप आवड आहे, हे आपण जाणतो. पण धोनीला घरखरेदीही आवडत असल्याच समोर आलं आहे. धोनीने नुकतेच महाराष्ट्रातील एका शहरात घर घेतलं आहे. (Team India Former Captain MS Dhoni Bought New Home in Pimpri Chinchwad Near Pune)
मागील वर्षी मुंबईत घर घेतलेल्या धोनीने यंदा पुण्याजवळी पिंपरी चिंचवडमध्ये नवे घर घेतले आहे.
धोनीने पिंपरी चिंचवडमधील किवळे गाव येथील एस्टाडो प्रेसिडेंशिअल सोसायटीमध्ये नवे घर घेतले आहे.
सध्या धोनी त्याच्या फॅमिलीसह रांची येथील फार्म हाऊसवर आहे. त्याच्या रांचीच्या फार्महाऊसच नाव 'कैलाशपति' असं असून सोशल मीडियावर तो तिथले बरेच फोटो टाकत असतो. ज्या फोटोतून धोनी सध्या एक निवांत आयुष्य घालवताना दिसत आहे.
उर्वरीत आयपीएल सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान युएईत होणार असल्याचं बीसीसीआयने स्पष्ट केले. त्यामुळे धोनीदेखील आयपीएलसाठी युएईला जाणार असून तो उर्वरीत सामन्यांत चेन्नईचे नेतृत्त्व करणार आहे.
धोनीला क्रिकेटसोबतच व्यवसायात देखील रस आहे. धोनीने एंटरटेनमेंट व्यवसायात याआधीच पाऊल टाकल आहे. 'एमएसडी एंटरटेनमेंट' असं धोनीच्या प्रोडक्शन कंपनीच नाव आहे. ज्याची हेड त्याची पत्नी साक्षी आहे.