दुसऱ्या क्रमांकावरही मुंबई इंडियन्सचे नाव आहे. मुंबईने आयपीएलमध्ये तीन वेळा चॅम्पियन असलेल्या चेन्नई सुपर किंग्जविरुद्ध 19 सामने जिंकले आहेत. धोनीच्या संघाचा आयपीएलमध्ये आश्चर्यकारक विक्रम असला, तरी रोहित शर्मासमोर चेन्नईचे शेर ढेर होतात. मुंबईने चेन्नईला साखळी फेरीत तर हरवलंच आहे, पण फायनलमध्येही तब्बल तीनवेळा हरवून थेट आयपीएलचं विजेतेपद पटकावलं होतं. मुंबई आणि चेन्नईत एकूण 31 सामने झाले आहेत. त्यापैकी 12 सामने चेन्नईने जिंकले आहेत, तर मुंबईने 19 सामन्यात विजय मिळवला. मात्र 2019 च्या आयपीएलपूर्वी दोन्ही संघ बरोबरीत होते. पण आयपीएल 2019 मध्ये मुंबईने सलग चार सामने जिंकले आणि आघाडी घेतली. दोन्ही संघांमधील गेल्या सात सामन्यांत मुंबईने सहा विजय मिळवले आहेत.